कारमध्ये सुरु होतं कांड? पत्नीने रंगेहाथ पतीला मैत्रिणीसोबत पकडलं आणि…

पतीला गमवावी लागली पोलिसाची नोकरी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: गिरी येथे आपल्या पत्नीला मारहाण केलेलं प्रकरण पोलीस कॉन्सटेबल आणि त्याच्या पोलीस कॉन्सटेबल मैत्रिणीच्या अंगलट आलं आहे. दोघानांवर पोलीस खात्यातून निलंबित होण्याची वेळ आली आहे.

हेही वाचाः चला ! बकासूराचा सामना करू…

गुरुवारी संध्याकाळची घटना

ही घटना गुरूवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास नामोशी गिरी येथे मुख्य रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी घडली. पत्नीने तिच्या पोलिस पतीला कारमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस पतीने पत्नीला रस्त्यावरच मारझोड करण्यास सुरुवात केली.

पोलिस कॉन्स्टेबल आणि त्याची मैत्रीण निलंबित

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकारावर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी पती पत्नी आणि त्याच्या मैत्रिणीला पोलीस स्थानकात आणून दोघाविरुद्ध रीतसर तक्रारीच्या आधारे परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याबाबतचा अहवाल पोलिसांनी वरीष्ठांना शुक्रवारी सकाळी सादर केला. या अहवालाच्या आधारे संध्याकाळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी पोलीस कॉन्सटेबल रोशल मार्टीन्स (पणजी वाहतुक पोलीस सेल) याच्यासह त्याच्या पोलीस कॉन्सटेबल मैत्रिणीला सेवेतून निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचाः मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर

सोशल मीडियावर व्हि़डिओ वायरल

हा मारहाणीचा प्रकार सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर घडला. त्यामुळे त्या ठिकाणी जमा झालेल्या जमावाकडून हा प्रकार मोबाईलवर चित्रीत केला गेला. हा चित्रीत केलेला व्हिडीओ शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसंच लोकांकडून या प्रकाराची निंदाही करण्यात आली.

हा व्हिडिओ पहाः MGP OFFICE IN MORJIM | मांद्रे मतदारसंघात मोरजी इथं मगो कार्यालयाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!