VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: रस्त्यावर कारमध्ये आरामात बसून फिरायला कोणाला आवडत नाही? पण, काही लोक गाडी चालवताना ना स्वत:चा विचार करत ना इतरांचा. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या अशाच एका ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण सुदैवाने, कार चालकाने प्रसंगावधान साधत वेळीच गाडी बाजुला केल्याने त्याचा जीव वाचला आहे.

हेही वाचाः धक्कादायक! वेबसाईट हॅक करून एकाच कुटुंबातल्या 16 जणांना लस दिल्याचं भासवलं

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की वाहने महामार्गावर वेगात धावत आहेत, परंतु या दरम्यान काही वाहने काही कारणास्तव उड्डाणपुलाच्या आधी थांबतात. त्यानंतर एक ट्रक मागून खूप वेगाने येतो. पण, सुदैवाने रस्त्यात थांबलेल्या एका कार चालकाने वेळेत वाहन बाजूला घेतले.

तर एक मोठा अपघात घडण्याची होती शक्यता

हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. जर या वेळी कार चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर एक मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. ज्यामध्ये अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला हे वाटेल मृत्यू या कारमधील लोकांच्या किती जवळ येऊन निघून गेला.

नेटकरी भडकले

हा व्हिडिओ पाहून काही लोक इतके भडकले की त्यांनी ड्रायव्हरला दोष देणं सुरु केलं. एका वापरकर्त्याने रागात लिहीलं की अशा मूर्ख लोकांमुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने असे म्हटले की, अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.

हेही वाचाः घरफोडीच्या गुन्ह्यातील मूळ संशयिताला अटक

रस्त्यावर नेहमी सतर्क रहावं

जरी अनेक लोक आभार मानत आहेत की कारमधील व्यक्तीचे प्राण वाचले. तथापि, काही लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणत आहेत की ट्रक चालक आणि कार चालक दोघांनीही समज दाखवली, ज्यामुळे हा मोठा अपघात टळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. यासह, लोक हे देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की रस्त्यावर नेहमी सतर्क रहावे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!