‘या’ वहिनी ठरल्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी…

होममिनिस्टरचं पुढचं पर्व होममिनस्टक सखी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : होम मिनिस्टर हा कार्यक्रम स्त्रीयांचा सर्वात आवडता कार्यक्रम. हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर गेली 18 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेक जण थक्क झाले होते आणि हि ११ लाखांची पैठणी पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली. 
हेही वाचा:धारदार हत्याराने पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या…

११ लाखाच्या पैठणीमुळे दिव्यांग्य मुलांनासुद्धा रोजगार

ही ११ लाखांची पैठणी येवेले येथिल प्रसिद्ध पैठणी सेंटर येवले पैठणी यात गेल्या सहा महिन्यांपासून बनत होती. महत्वाच म्हणजे ही साडी बनवण्याचं काम कापसे पैठणीमधील दिव्यांग विद्यार्थी तयार करत होते. या ११ लाखाच्या पैठणीमुळे या दिव्यांग्य मुलांनासुद्धा रोजगार मिळाला. त्यामुळे जिच्या पदरी ही साडी पडणं ती स्त्री भाग्यवानच असं म्हटल्यास हरकत नाही.
हेही वाचा:एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या…

१० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला

१० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला होता त्यात अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले होत्या आणि फायनलिस्ट वहिनींना टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे वहिनी ठरल्या महामिनिस्टरच्या महाविजेत्या. 
हेही वाचा:Google वर ‘हे’ सर्च केल्यास, जावे लागेल तुरुंगात!

पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडले

११ लाखांच्या या पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडलेले होते. पैठणी जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. होममिनिस्टरचं पुढचं पर्व होममिनस्टक सखी या नावाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
हेही वाचा:भावाकडून बहिणीला सरप्राईज गिफ्ट, वाचा सविस्तर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!