देशाच्या आरोग्य यंत्रणेचं काय झालंय? हे सांगणारे ६ Photo आणि तो एक Video!

कोरोनाच्या प्रकोपात सर्वसामान्यांची होरपळ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

हृदयद्रावक

लखनौच्या भैसाकुंडमधील हा फोटो. कोरोनानं दगावलेल्यांचा अंतिम संस्कार केला जातोय. एका वेळी जेवढ्या मृतांना अग्नी दिला जातोय, ते चित्र हादरवून टाकणारं आहे.

दुर्दैवी

भोपाळ हे मध्य प्रदेशात येतं. या फोटोत स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता की, की चक्क पीपीई किट घालून मृत्यू झालेल्या नातलगाचे अंतिम संस्कार केले जात आहेत. (फोटो सौजन्य – पीटीआय)

आक्रोश

हा फोटो राजधानी दिल्लीतला. दिल्ली. जिथल्या आरोग्य व्यवस्थेचं आणि यंत्रणेचं कौतुक गेले काही वर्ष आप सरकार आणि केजरीवाल सातत्यानं करत आले आहेत. तिथली यंत्रणाही कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं कोलमडली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य कोरोनामुळे दगावल्यानं न राहून टाहो फोडणारे कुटुंबीय एकमेकांना कसेबसे सावरत आहेत. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)

कहर

गुजरातमधील हा फोटो. गुजरातच्या सूरतमध्येही कोरोनानं कहर केलाय. कोरोनामुळे दगावलेल्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानं त्यांच्या अस्थी हरिद्वारला घेऊन जाण्याची तयारी सुरु आहे. (फोटो सौजन्य – पीटीआय)

भीषण

भीषण. हा फोटो आपल्या देश किती मागासलेला, याची जाणीव करुन देणारा. हे चित्र आहे छत्तीसगडमधलं. छत्तीसगडच्या साजनांदगांव जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणावरचा हा फोटो आहे. ठिकाणाचं नाव आहे, डोंगरगाव. ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही, म्हणून इथले चार रुग्ण दगावलेत. परिस्थिती इतकी लाजीरवाणी की चक्क कचऱ्याच्या गाडीतून मृत रुग्णांचे शव नेण्यात आले.

विदारक!

देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर. याच शहरातील हा फोटो आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरचा. कोरोनामुळे महाराष्ट्रात कर्फ्यू लागला. अनेक प्रवासी आपल्या घरी जायला निघाले. अशातच एका वयोवृद्ध रुग्णाला चालत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबीयांवर आली आहे. (फोटो सौजन्य – पीटीआय)

हतबल

हतबलता किती विचित्र आणि भयानक असते, हे दर्शवणारा हा व्हिडीओ. या व्हिडीओ आहे उत्तर प्रदेशातील एका स्मशानभूमीचा. स्मशानभूमीतलं कटू वास्तव सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील. पण कदाचित व्हिडीओमधील ही दृश्यं अजूनही बेजबाबदारपणे वागणाऱ्यांचे कदाचित डोळे उघडू शकेल. लोकांना अग्नि देण्यासाठीसुद्धा अनेक स्मशानभूमींमध्ये वेटिंग लाईन आहे. कल्पनाही करु शकणार नाही, अशी भयंकर परिस्थिती सध्या आपल्या सगळ्यांची परीक्षा घेते आहे.

काळजी घ्या. मास्क लावा. सोशल डिस्टन्सिंग मेन्टेन करा.

हेही वाचा –

कोरोनाची ही आकडेवारी प्रत्येकानं पाहायलाच हवी! कोणत्या राज्यात किती मृत्यू आणि कुणाचं सरकार?

CORONA UPDATE | ब्रेकिंग । आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!