Viral | मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यावर गडकरींचा तो व्हिडीओ व्हायरल

पाहा नितीन गडकरी आंदोलनावर काय म्हणाले होते?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दिवस सोमवारचा. तारीख ८ फेब्रुवारी 2021. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन सनसनाटी विधान केलं होतं. या विधानावरुन सोशल मीडियात तुफान चर्चा रंगली होती. देशात आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. राज्यसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडीओ वायरल झाला. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी आंदोलन करणाऱ्यांच्या बाजून बोलताना तत्कालीन पंतप्रधानांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावेळी आंदोलनाबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरुन गडकरींनी लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्याबद्दल निशाणा साधला होता. त्यांचा हा व्हिडीओ आता पुन्हा एकदा चर्चिला जातो आहे. टीव्ही ९ मराठी हा वृत्तवाहिनीनं आपल्या यू-ट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आंदोलनजीवी परजीवी या दोन शब्दांचा आधार घेत हा व्हिडीओ तुफान वायरल झाला आहे.

काय म्हणाले होते गडकरी?

हे पाहा पंतप्रधान जी गोष्ट सांगत आहेत..ती लोकशाहीच्या विरोधात आहे. या देशात भ्रष्ट नेत्यांविरोधात आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार काँग्रेसने दिलेला नाही. हा अधिकारी संविधानानं दिलेला अधिकार आहे. बोलण्याचं स्वातंत्र, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र आपल्याला आहे. असं असतानाही शांतीपूर्ण आंदोलन लोकांनी न करणं, हे पंतप्रधान कोणत्या आधारावर म्हणत आहेत? त्यांचं विधान योग्य आहे का, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुमच्या आमच्या विरोधात बोलाल, तर आम्ही तुमचं आंदोलन चालू देणार नाही, अशी निती वापरली जातेय. एकीकडे सरकार जसं काम करतेय आणि जे वक्तव्य पंतप्रधानांनी केलंय, ते पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधात आहे. देशाची जनता जी लोकशाही आत्मा मानते, ती अशा वक्तव्याचं समर्थन नाही करु शकतं. पंतप्रधानांना जर अशाच पद्धतीनं देश चालवायचा असेल, तर देशाची जनता ते कधीच सहन करणार नाही.

पाहा गडकरींचा वायरल व्हिडीओ –

सौजन्य – टीव्ही 9 मराठी

हेही वाचा –

मंगेशकर, तेंडुलकर शेतकरी विरोधी बनलेत का? ट्विटरवर दोघांवरही तुफान टीका

नवा शेतकरी कायदा चांगला की वाईट? | शेतकरी कायद्याचे अभ्यासक अमर हबीब यांच्याशी विशेष संवाद

जबरदस्त! आठवड्याला ३ सुट्ट्या देण्याच्या मोदी सरकारकडून हालचाली?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!