कोविड सेंटरमध्ये ‘गुटर गुटर’, पाहा व्हिडीओ

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : काळ मोठा कठीण आला आहे. पण म्हणून सगळं सोडून रडत थोडीच बसायचं असतं. दिवस नवरात्रौत्सवाचे आहेत. म्हणजे गरबा, दांडिया आलाच. हाच गरबा दांडिया चक्क कोविड सेंटरमध्ये खेळला जातोय. खरंतर गर्दी नको, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचेत, म्हणून अनेक गोष्टींवर बंधनं आली आहेत. पण कोविड सेंटरमध्ये रुग्णांना गरबा खेळताना पाहून अनेकांचे डोळे मोठे झालेत.
खरी मजा आतमध्ये?
कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. भव्यदिव्य दांडियाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती. स्वाभाविक आहे, अशा नाराज लोकांनी कोविड सेंटरमधील लोकांना गरबा खेळताना पाहणं, थोडंसं जेलस फिल करायला लावणारंच आहे.
इथं रुग्ण मास्क लावून गरबा खेळत आहेत. पीपीई किट घालूनही ठुमके लावणारे, या व्हिडीओमध्ये दिसून आलेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या कोविड सेंटरचा आहे, ते कळू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला. तुम्ही पाहिला की नाही?