हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : पिझ्झा. चमचमीत. त्यातही चीज बर्स्ट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. मात्र पिझ्झा ज्या ब्रेडवर तयार केला जातो, त्या ब्रेडचा एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर तुम्ही पिझ्झा खाण्याआधी शंभरवेळा विचार कराल.
पिझ्झासाठी लागणारा ब्रेड कसा तयार होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? अर्थात तो बेकरीमध्ये तयार होत असावा, असं वाटणं स्वाभाविकच आहे. पण पिझ्झासाठी लागणारा ब्रेड नेमका कसा बनवला जातो, हे दाखवणाऱ्या एका व्हिडीओ सध्या खळबळ उडवून दिली आहे.
#Budget2021 | अर्थसंकल्पाचे थेट संकेत, दारु महागणार कारण…
पत्रकार श्रीरंग खरे यांनी पिझ्झा बनवतानाचा हा धक्कादायक व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दिसणारं चित्र भयानक आहे. चक्क पाय देऊन पिझ्झाचा ब्रेड बनवला जात अशल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. ब्रेडवर उभं राहून कामगार पिझ्झाचा ब्रेड बनवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमुळे चवीचवीनं पिझ्झा खाणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय.
पाहा व्हिडीओ –
कोरोनानंतर अनेकजण हेल्थ कॉन्शियस झालेत. बाहेरच्या खाण्यावरही अनेकांनी आधीच बंधनं घालून घेतली आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा जंक फूडची क्रेझ वाढू लागली आहे. अशातच हा धक्कादायक व्हिडीओनं पुन्हा बाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर सवाल उपस्थित केलेत.
हेही वाचा –
थंडीच्या दिवसात गाजर खाताय ना? हे आहेत गाजर खाण्याचे खास फायदे
गोव्यात ‘या’ कॅन्सरचे प्रमाण जास्त, ही खबरदारी महत्वाची
ग्रीन टी पित असाल तर हे वाचाच..