Video | जीव धोक्यात घातला, पण वीज कर्मचाऱ्यानं कर्तव्य बजावलं!

वीज कर्मचाऱ्याच्या धाडसाला सलाम!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : लाईट गेली की वीज खात्याच्या नावानं बोंबा मारणं काही नवीन नाही. पण जिवाची पर्वा न करता काम करणारे कर्मचारीही वीज खात्यात पाहायला मिळतात. अशाच एका धाडसी वीज कर्मचाऱ्याचा व्हिडीओ समोर आलाय.

पुराच्या पाण्यातून जाणारा माणूस वीज कर्मचारी आहे. याचं नाव रुपेश महाडीक असल्याचं सांगितलं जातंय. गळ्याएवढ्या पाण्यातून हा वीज कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे सरसावला होता. राजापूर तालुक्यातल्या केळवली गावातील एक व्हिडीओ समोर आला आहे. वीज वितरण कंपनीचे रुपेश महाडीक हे मोसम बनवाडी इथं एबी स्विच बंद करण्यासाठी गेले होते. त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.

हेही वाचा : Video | CCTV | रेल्वे लाईन क्रॉस करतानाच गाडी अडकली, रेल्वेनं चिरडलं!

गेले काही दिवस कोकणात मुसळधार पावासनं नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अशावेळी पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका विजेच्या पोलवरील एबी स्वीच बंद कसा करायचा हा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला होता. मात्र रुपेश महाडिक यांनी धाडस दाखवत, हे काम केलंय. लाईट गेल्यानंतर वीज खात्याच्या नावानं गळा काढणाऱ्यांनी धाडसी वीज कर्मचाऱ्यांना प्रोत्साहितही करायला हवं, हे या व्हिडीओतून अधोरेखित झालंय.

हेही वाचा : VIDEO | भयानक दुर्घटना! दुचाकी-कारची धडक

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!