VIDEO VIRAL | दिवंगत पित्यास श्रद्धांजली वाहताना चिराग पासवान ड्रामा करता होते?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

बिहार : रामविलास पासवान यांच्यानंतर त्याचा मुलगा चिरागवर सगळ्यांची बारीक नजर आहे. रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर चिराग यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल झालाय. लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुखा चिराग पासवान यांचा हा तुफान वायरल झालेल्या व्हिडीओची सध्या जोरात चर्चा आहे. बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडण्याच्या पूर्वसंध्येलाच हा व्हिडीओ वायरल होणं, याला फार महत्त्वंय. कारण त्याचा परिणाम मतांवरही होणार, हे नक्की.

काय आहे व्हिडीओमध्ये?

वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहत असताना चिराग पासवास रिहर्सल करत असल्याचं समोर आलाय. तसा व्हिडीओही समोर आलाय. या व्हिडीओमुळे आता जेडीयू चिराग पासवान यांच्या निशाणा साधणार, हे नक्कीच. वायरल व्हिडीओमध्ये चिराग पासवान आपल्या एका महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचं शूटींग करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहारी फर्स्ट, बिहार फर्स्ट असं त्या कार्यक्रमचं नाव होतं.

कुणी आणला व्हिडीओ समोर?

काँग्रेस नेता पंखुडी पाठकने हा व्हिडीओ समोर आणलाय. त्यानंतर चर्चांना एकच उधाण आलंय. दिवंगत वडलांच्या फोटोसमोर चिराग पासवान ड्रामा करत असल्याचा लाजीरवाणा प्रकार असल्याची टीका करण्यात आली आहे. लोकांनी अशा ड्रामेबाज लोकांपासून सावध राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…

थोडक्यात अनर्थ टळला! झाडाची फांदी पडून कारचं मोठं नुकसान

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

कोविड सेंटरमध्ये ‘गुटर गुटर’, पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!