धक्कादायक! हा Video पाहा आणि तुम्हीच सांगा या अपघाताला कारणीभूत कोण ते!

अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : भारतात रस्ते अपघातातील बळी जाण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. रस्ते अपघातातील मृतांचा आकडा हा चिंताजनकी असल्याचं सातत्यानं पाहायला मिळालेलंय. अशातच वेळोवेळी सांगूनही आणि आवाहन करुन देखील रस्ते अपघात रोखायचे कसे, असा मोठा प्रश्न कायम आहे.

एका भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या मध्ये एका चौकात कार रस्ता ओलांडणाऱ्याला अक्षरशः हवेत उडवल्याचा चित्तथरारक प्रकार समोर आलंय.

एक ग्रे कलरची होंडा सिटी कार भरधाव वेगान रस्त्यावरुन जात होता. दरम्यान, याच वेळी चौकतून एक माणूस रस्ता क्रॉस करत होता. रस्ता क्रॉस करताना या माणसानं काहीच पाहिलं नव्हतं. आजूबाजून वाहन येतंय, हे पाहण्याची तसदीही घेतली नाही.

हेही वाचा – म्हापशात ३ वाहनांचा विचित्र अपघात, तरुणीच्या डोक्यावरुन गेलं टेम्पोचं चाक, जागीच मृत्यू

त्यानंतर अचानक रस्त्याच्या मधोमध आल्यानंतर या इसमाला भरधाव वेगानं होंडा सिटी कार आपल्याच दिशेने येते आहे, हे लक्षात आलं. यावेळी इसमानं मागे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र त्याआधीच होंडा सिटीनं आपला मार्ग बदलला होता. त्यामुळे गाडी आणि हा इसम एकाच रेषेत आले. आता रस्त्यावरील माणूस मागे येतोय, म्हणून होंडा सिटीच्या चालकानं गाडी उजवीकडे वळवली खरी. पण तितक्यात जे व्हायला नको होतं, तेच झालं. नेमक्या त्याच क्षणी रस्ता क्रॉस करणारा माणूसही गोंधळला आणि पुन्हा समोरच्या दिशेने जाऊ लागला. हे सगळं काही सेकंदाच्या आत घडलं.

हेही वाचा – नागझरजवळ अल्टो कारचा अपघात! चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला

अखेर वेगावरही नियंत्रण राहिलं नाही. आणि होंडा सिटीनं रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसाला उडवलंच. मात्र त्यानंतरही होंडा सिटीचा वेग कमी झाला नाही. त्यानंतरही त्याच वेगानं ही कार पुढे निघून गेली. या सगळा थराराक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. ही घटना घडली आहे, लखनऊमध्ये. 17 जुलैला झालेला हा अपघात अंगावर काटा आणणारा तर आहेच, शिवाय हा अपघात रस्त्या क्रॉस करताना बेसावधपणे रस्ता ओलांडल्यास काय होऊ शकतं, याची जाणीव करुन देणार आहे.

पाहा हा धक्कादायक Video –

हे देखील पाहा –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!