भरत जाधव रमला विठ्ठलभक्तीमध्ये वाचा सविस्तर…

भरतनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पंढरीच्या विठूरायाला घातली हळवी साद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रीपोर्ट – अनेक वर्षांपासून नाटक, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सहजसुंदर अभिनयानं त्यानं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या फारसा सिनेमांत दिसत नसला तरी टकात तो सक्रीय आहे. त्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. विविध विषयांवर आधारीत तो पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता देखील भरतनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पंढरीच्या विठूरायाला हळवी साद घातली आहे.

हेही वाचा:पावसाचा रेड अलर्ट; आठवीपर्यंत सुट्टी…

भरत सोशल मीडियावर सक्रिय

मराठीतील सुपरस्टार असं ज्यांना म्हटलं जातं ते अभिनेते म्हणजे भरत जाधव. त्यांनी आपल्या अभिनयाने भरत जाधव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्याचे पाहायला मिळत आहे. भरत सोशल मीडियावर सक्रिय असतो. मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी भरभरून लिहितो. तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे. सोशल मीडियावर भरत जाधवच्या पोस्ट व्हायरल होत असतात. भरतने पढंरपूरच्या पाडुंरंगला साद घातली आहे.

हेही वाचा:अंगणवाडी सेविकांची प्रकृती खालावली…

मला तुझ्याकडून काहीच नको

पंढरपूरची आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे., आज उद्या पालख्या पंढरपूरात दाखल होतील. हळूहळू घराघरातील वातावरण हरीमय होत असतानाच अभिनेता भारत जाधव याने पांडुरंगाला हळवी साद घातली. कपाळावर पांडुरंगाचा बुक्का लावलेला फोटो शेयर करत भारत म्हणतो. सर्वसामान्यापासून ते कलाकारापर्यंत प्रत्येकाला विठुरायच्या दर्शनाची ओढ लागली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी चालत पंढपुरात दाखल होत आहेत. टाळ-मृदूंगाच्या गजरात प्रत्येक वारकरी न्हाऊन निघाला आहे. भरतने ही पढंरपूरच्या पाडुंरंगला साद घातली आहे. मला तुझ्याकडून काहीच नको…मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे..!!

हेही वाचा:अंगणवाडी सेविकांची प्रकृती खालावली…

ऑल द बेस्ट या नाटकाला भरघोस यश

भरत जाधव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकट फु, सही रे सरी अशा किती नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही चित्रपटे आजही प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत असतात. ऑल द बेस्ट या नाटकाच्या भरघोस यशानंतर भरत खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला.

हेही वाचा:तिळारी धरणाचे दरवाजे उघडले…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!