एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या…

व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडा इथला असल्याचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : अनेकदा पाऊस हा रोमँटीक वाटू लागतो. मात्र, यंदा शहरात फारसा पाऊस झालेला नाही. पाऊस जीतका रोमँटीक असतो तितकाच तो भयानक ही असतो. मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक अपघातांच्या घटनाही घडत असतात. अशाच प्रकारची एक घटना बाईक चालकां बरोबर घडली आणि त्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडा इथला असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र या व्हिडीओची सत्यता जाणून घेतल्यानंतर या व्हिडीओमागचं सत्य समोर आल.
हेही वाचा:Google वर ‘हे’ सर्च केल्यास, जावे लागेल तुरुंगात!

अनेक बाईक चालक रस्त्यावर घसरून पडले

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, अनेक बाईक चालक रस्त्यावर घसरून पडतात. त्याच प्रमाणे सगळीकडे धुवॉंधार पाऊस देखील कोसळत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतो. पावसात रस्त्यावरून वेगात येणाऱ्या बाईक एका मागोमाग एक घसरून पडत आहेत. बाईकवर बसलेले लोक सुद्धा बाईकवरून खाली रस्त्यावर फरफटत खाली पडताना दिसत आहेत. आधी सगळ्यात पुढची बाईक रस्त्यावरून घसरते, त्यानंतर त्यामागची बाईक आणि असं करता करता सगळ्याच बाईक रस्त्यावरून घसरतात अस या व्हिडीओत पहायला मिळत.
हेही वाचा:भावाकडून बहिणीला सरप्राईज गिफ्ट, वाचा सविस्तर…

व्हिडीओमागचं सत्य समोर आलं

नवी मुंबईतील सानपाडा या भागातील हा व्हिडीओ असल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमागचं सत्य समोर आल. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडाचा नसून तो पाकिस्तानमधल्या कराचीमधला असल्याचं समोर आल. पाकिस्तानी ट्विटर युजर अब्दुल अझीझ नोमान यांनी २२ जून रोजी कराचीच्या रस्त्यांचे किंवा इतर पायाभूत सुविधांचे फोटो मागवलेल्या ट्विटला रिप्लाय म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये ५ सेकंदासाठी ‘होंडा’चे शोरूम दिसत होते. कराचीमधील होंडा शोरूमसाठी Google Map वर शोध घेतला असता अगदी त्याच्यासारखंच ठिकाण रशीद मिन्हास रोडजवळ सापडतं.
हेही वाचा:कॅबने केले गोवा राज्य सरकारचे कौतुक…

एकदा त्याची सत्यता पडताळून पाहावी

व्हायरल व्हिडीओच्या स्क्रीनशॉटसह Google फोटोंची तुलना केल्यानंतर, हे स्पष्ट झाले की शोरूम आणि डावीकडील ‘फ्री पार्किंग’ गेट कराची शहरातील होती. यावरून समजत की हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडा नसून तो पाकिस्तानच्या कराचीमधला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली अशी एखादी गोष्ट अनेकांना पटकन खरीही वाटू शकते, ही देखील वस्तुस्थिती आहे. असे व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पसरवून कुणाला काय साध्य करायचंय? हे कळायला मार्ग नाही. पण निदान शिकल्या सवरल्या लोकांनी तरी असे व्हिडीओ फॉरवर्ड करताना एकदा त्याची सत्यता पडताळून पाहावी, अशी अपेक्षा नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:पुष्पाच्या ‘श्रीवल्ली’चा मृत्यू होणार ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!