महाभयंकर! पुलावरुन कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकून दिला

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज हजारो लोकांचे जीव जात आहेत. मृत्यूदर मे संपत आला तरी आटोक्यात येताना दिसत नाहीये. अशातच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह चक्क पुलावरुन नदीच फेकून दिला जात असल्याचं दिसून आलंय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओमध्ये पुलावरीन दोघे जण एका मृतदेह उचलताना दिसलेत. हा सगळा प्रकार एका पुलावर घडतोय. एका माणसानं गाडीतून या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. एकानं पीपीई किट घातलंय. तर एकानं पीपीई किट घातलेलं नाहीये. मात्र प्लास्टिमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह नदीत फेकून दिला जात असल्याचा दावा या वायरल व्हिडीओच्या माध्यमातून केला जातो आहे.

कुठची घटना?

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, यावरुनही अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. घटना आहे बलरामपूरच्या सिसई घाटाजवळील पुलावरील. ही घटना घटली आहे, २९ मे रोजी.

२८ मे रोजी प्रेमनाथ मिश्रा यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. २५ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं होतं. दरम्यान, मृत्यू झाल्यानंतर कोविड प्रोटोकॉलनुसार प्रेमनाथ यांचा मृतदेह अत्यविधीसाठी नेण्यात आला. तिथे त्यांच्या कुटुंबीयांकडे मृतदेह सोपवण्यात आला. यानंतर टीम परत आली. पण यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचा मृतदेह नदीत फेकून दिला. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!