‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
वेंगुर्ले : झी मराठीवरील (Zee Marathi) प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाई सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील बबड्या हे पात्र एका आजींना फारच खूपतंय. या आजींचा एक व्हिडीओ वायरल झालाय. त्यामध्ये या आजी मालवणीतून बबड्याचा शाब्दिक फटके देताना दिसल्यात. निरागस आजीबाईंचा हा व्हिडीओ सध्या तुफाज गाजतोय.
अग्गबाई सासूबाई या मालिकेतील बबड्या हे पात्र नकारात्मक भूमिकेत आहे. या काल्पनिक पात्राचा आजीबाईंनी खरपूस समाचार घेतलाय. बबड्या डँबिस हा, घरातून चालता हो म्हणावं, असं सुनावणाऱ्या वेंगुर्ल्यातील आजीबाईंची चर्चा सध्या जोरात आहेत. अग्गबाई सासूबाई ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर रसिक प्रेक्षकांनी या मालिकेतील पात्रांवर गॉसिपींग करण्यासही सुरुवात केली आहे. वेंगुर्ल्यातील या आजी तर बबड्याबद्दल बोलताना किती इनोसंट वाटत आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल…