‘लाल सिंग चड्ढा’ ‘या’ हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान हा आज प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी क्लासिक चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असला तरी, लाल सिंग चड्ढा यांच्या टीमने या चित्रपटाला आपल्या देशाच्या रंगांत रंगवलं आहे.
हेही वाचा:’हे’ आहेत राष्ट्रपती पदकप्राप्त झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी…
सर्वात कमाई करणारा चित्रपट
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून आमिर खानबरोबर करीना कपूरही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण त्याआधीपासूनच बॉयकॉट ट्रेंडमुळे या चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. आमिरच्या गेल्या १० वर्षांच्या करकीर्दीतला हा सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आमिरच्या सिनेमाची कुठेच जास्त हवा नसली तरी मुळ सिनेमा म्हणजेच ‘फॉरेस्ट गंप’ सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ नंबरवर ट्रेंड होतोय.
हेही वाचा:संजीवनी साखर कारखान्याजवळ अपघात : एक ठार…
अमेरिका देशाचा प्रवास
‘फॉरेस्ट गंप’ची कथा ही बुध्यांक कमी असलेल्या एका असामान्य व्यक्तिची आहे. तसेच या चित्रपटात त्या व्यक्तिबरोबर अमेरिका या देशाचा प्रवाससुद्धा मांडलेला आहे. अमेरिकेतल्या मुख्य राजकीय तसेच सामाजिक घडामोडी आणि त्यासोबत ‘फॉरेस्ट गंप’ या व्यक्तीचं जीवन या चित्रपटात उलगडतं. या चित्रपटाला भारतीय साच्यात बसवण्यात लेखक अतुल कुलकर्णी यांना चांगलंच यश आलं आहे.
हेही वाचा:Shocking | Crime | पाच महिन्यांच्या चिमुकलीचा जन्मदात्यांनीच घेतला बळी, लाटण्याने…
सामाजिक आणि राजकीय घटनांचं चित्रण
‘फॉरेस्ट गंप’ व ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या घटनांद्वारे साम्य आढळून आलं आहे. ‘फॉरेस्ट गंप’मध्ये जितकं अचूक सामाजिक आणि राजकीय घटनांचं चित्रण केलं गेलं आहे तितकंच अचूक भारतीय घडामोडींचं चित्रण करायचा प्रयत्न ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये केला आहे. लेखक अतुल कुलकर्णी यांनी त्या सगळ्या घटना अचूक पटकथेत पेरल्या आहेत. या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी आमिर खानला तब्बल ८ वर्षं लागली. १४ वर्षांच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीनंतर हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा:Accident | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन…