Sleep Champion | कोलकाताची तरुणी १०० दिवस ९ तास झोपली अन् मिळाले ५ लाख रुपये…

पटकावला ५ लाखांचा ‘स्लीप चॅम्पियन’चा किताब!

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोलकाता : येथील २६ वर्षीय तरुणी त्रिपर्णा चक्रवर्ती हिला रोज १०० दिवस ९ तासांच्या गाढ झोपण्याच्या कौशल्यासाठी ५ लाख रुपये मिळाले आहेत. त्रिपर्णाने Wakefit.co द्वारे एका इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत भाग घेतला होता, ज्यामध्ये ‘इंडियाज फर्स्ट स्लीप चॅम्पियन’ किताब जिंकल्यामुळे तिला मुकूट प्रदान करण्यात आला.
हेही वाचा:Asia Cup 2022 : आज ठरणार आशियाचा ‘राजा’…

रोज १०० दिवस सलग ९ तास झोप

त्रिपर्णाने Wakefit.co ला एका इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज केला होता. हा सीझन जिंकण्यासाठी ती सलग १०० दिवसांत ९ तास झोपली. तिने अंतिम फेरीत चार स्पर्धकांना पराभूत करून ‘लाईव्ह स्लीप ऑफ’ हा किताब जिंकला. कंपनीने एक सोशल मीडिया पोस्ट टाकून त्रिपर्णाला ‘वेकफिट स्लीप इंटर्नशिप सीझन २’ ची चॅम्पियन म्हणून घोषित केले. तिच्या कौशल्यांना ९५ टक्केच्या स्कोअरसह रेटिंग दिली.
हेही वाचा:Google | गूगलच्या लोगोचा रंग का बदलला? सुंदर पिचाईंनी सांगितले ‘हे’ कारण…

४.५ लाख स्पर्धकांना केले पराभूत

वेकफिट या होम आणि स्लीप सोल्यूशन्स कंपनीने आयोजित केलेल्या या स्लीपिंग स्पर्धेत सुमारे ४.५ लाख लोकांनी भाग घेतला आणि त्रिपर्णा चक्रवर्ती या सर्वांना पराभूत करून विजेती ठरली. संपूर्ण भारतात ही अनोखी झोपण्याची स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून कळल्यावर या स्पर्धेत भाग घेतल्याचे त्रिपर्णाने सांगितले.
हेही वाचा:Goa Football | एजे कंबोर्डा संघाला फुटबॉलचे जेतेपद…

कठोर परिश्रमासोबतच, पुरेशी झोपही तितकीच आवश्यक

‘मी ४.५ लाख अर्जदारांपैकी एक असल्यामुळे उत्साही होते. तसेच प्रत्येकाला चांगले काम करण्यासाठी सलग आठ तासांची झोप आवश्यक आहे. कठोर परिश्रमासोबतच, पुरेशी झोपही तितकीच आवश्यक आहे’, असे किताब जिंकल्यानंतर त्रिपर्णा म्हणाली.
हेही वाचा:Scam | पंजाब-महाराष्ट्र बँक घोटाळ्याचा गोमंतकीयांवर परिणाम, वाचा सविस्तर…

या पॅरामीटर्सवर स्पर्धकांचे परीक्षण

स्पर्धेदरम्यान झोपेचा कालावधी, जागे होण्याची वेळ, हलकी झोप आणि गाढ झोप या पॅरामीटर्सवर स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांनाही प्रत्येकी १ लाख रुपये मानधन मिळाले. जीवनात पुरेशी झोप ही महत्त्वाची असून त्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला.
हेही वाचा:JOB VARTA | महिलांसाठी स्वावलंबी होण्याची सुवर्ण संधी

नऊ तासांच्या शांत झोपेसाठी १० लाख रुपये

स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये सुमारे १.७ लाख अर्जदार होते आणि ‘सीझन २’ च्या यशानंतर, वेकफिटने ‘सीझन ३’ची घोषणा केली. पुढील सीझनसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, जिथे विजेत्याला १०० रात्री ९ तासांच्या शांत झोपेसाठी १० लाख रुपये दिले जातील.
हेही वाचा:‘कर्लिस’ रेस्टॉरंटचे बांधकाम हटवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!