वेळेच्या अगोदरच रिलीज झालाय ‘हा’ टीझर

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
मुंबई : ‘केजीएफ चॅप्टर १’चा बराच गाजल्यानंतर आता मोस्ट अवेटेड ‘केजीएफ चॅप्टर २’चा टीझर रिलीज झालाय. महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस अगोदरच हा टीझर रिलीज करण्यात आलाय. सुपरस्टार यशच्या वाढदिवसादिवशी सिनेमाचा टीझर लाँच करणार होते. मात्र त्यांनी एक दिवस अगोदर केलाय. या टीझरची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. या टीझरला होमबेल फिल्म्सने यूट्यूबवर रिलीज केलंय. टीझर रिलाज होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगलीये.
सिनेमाच्या टीझरची सुरुवात रॉकीची आई आणि त्याचं बालपण यापासून झालीये. रॉकीच्या आईने त्याला कसं सांभाळलं? रॉकी कसा मोठा झाला? आईला दिलेला शब्द तो कसा पाळतो? याने होते. रवीना टंडन यामध्ये एका खासदाराच्या भूमिकेत दिसतेय. तर संजय दत्त अधीराच्या लूकमध्ये दिसतोय. मात्र अजून संजय दत्तचा चेहरा दाखवलेला नाहीये. यामध्ये यश जबरदस्त ऍक्शन करताना दिसतोय.
टीझरमध्ये गाड्यांचा एक शानदार अंदाज पाहायला मिळतोय. यशचा स्वॅग, स्टाइल आणि त्याचा लूक अतिशय खतरनाक आहे.
सिनेमात दिसणार हे कलाकार
सिनेमात संजय दत्त, यश, रवीना टंडन, श्रीनिधि शेट्टी, प्रकाश राजयांसोबत अनेक कलाकार दिसणारेत. कन्नड सुपरस्टार यशबद्दल बोलायचं झालं तर त्याचा अनोखा स्वॅग आहे.