मज्जानी लाईफ! आज्जीबाईंची हौस लय भारी…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पण करोनाच्या भीतीमुळं म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळं सेलिब्रेशन्सवर मर्यादा आल्यात. एरव्ही शहरोशहरी आणि आत्ता नजीकच्या काळात गावोगावी फुलणारे गरबा नृत्यांचे फड यंदा दुर्मिळ झालेत. केवळ गुजराती समाजच नव्हे तर इतर समाजातील आबालवृद्धही दांडिया आणि गरबाचे फॅन. सध्याच्या नवरात्रीत मात्र त्यांच्या उत्साहावर करोनानं विरजण घातलंय. अनेकांनी तर ऑनलाईन पद्धतीनं दांडियांचं आयोजन करून आपली हौस भागवलीय.
असा रंगला गरबा
अशाच एका वयोवृद्ध आजीबाईंची हौस भागवण्याची जबाबदारी त्यांच्या प्रेमळ नातवानं उचललीय. या आजी-नातवाचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओतील आज्जीबाई उठू शकत नसल्यानं त्यांना खुर्चीवरच बसवण्यात आलंय तर नातू त्यांच्या समोर गरबा खेळतोय. असा हा व्हिडिओ आहे. आज्जीही यात दिसखुलासपणं टाळ्या देत असल्याचं दिसून येतय. आज्जी नातवाच्या प्रेमाचं दर्शनही या व्हिडिओच्या माध्यमातून घडत असल्याचं दिसतंय.
गेल्या वर्षी एका आज्जीबाईंचा खुल्या मैदानात फ्लड लाईट्सच्या प्रकाशात गरबा खेळतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.
This video made my day! The grandson is so sweet! pic.twitter.com/3O2k6Y8N47
— Shefali Vaidya. (@ShefVaidya) October 23, 2020