कडक सॅल्युट! ‘त्या’ वाहतूक पोलिसाच्या संयमाचं रहस्य जाणून घ्या

एका महिलेनं वर्दीवर हात उचलला होता

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : महाराष्ट्रात एक वर्ष असं होतं, ज्या वर्षात पोलिसांच्या वर्दीवर हात उचलणाऱ्या बातम्याच फक्त समोर येत होत्या. फक्त मुंगी पोलिसांच्या वर्दीतवर हात टाकायची बाकी राहिली होती. तत्कालीस सरकारवर तेव्हा सडकून टीकाही झाली होती. सरकार बदललं. वातावरण बदललं.

चिखलफेक करणारे कोण?

मधल्या काळात पोलिसांवर पुन्हा चिखलफेक झाली. सुशांत आत्महत्याप्रकरणावरुन मोठा गदारोळ झाला. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. यावरुन राजकारणही सुरु झालं. पोलिसांवर शंका घेतली जाऊ लागली. अखेर पोलिसांची बदनामी करण्यासाठी तब्बल हजारो फेक अकाऊंट सोशल मीडियात बनवण्यात आल्याचंही समोर आलं. पण हल्लीच एक भयंकर व्हिडीओ समोर आला.

मारहाण व्हायरल

मुंबईत एक भयंकर प्रकार घडला. वाहतूक पोलिसाला एका महिलेनं मारहाण केली. घाणघाण शिव्याही घातल्या. पण या पोलिसांनं संयम राखला. नंतर रितसर तक्रार करण्यात आली. आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं. मात्र तोपर्यंत मारहाणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर धडकला. प्रचंड व्हायरल झाला.

एक्स्क्लुझिव्ह

पोलिसाच्या संयमाचं कौतुक झालं. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली. वाहतूक पोलिस एकनाथ पार्टे यांचा सत्कार केला. त्यांच्या संयमाला सलाम केला. खरोखरंच त्यांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं कमीच. याच एकनाथ पार्टेंशी गोवनवार्ताने संवाद साधला. त्यांच्या संयमाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काय म्हणालेत, एकनाथ पार्टे.. तुम्हीच ऐका…

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

EXCLUSIVE | पेडण्याची सून आहे मुंबईची महापौर! किशोरी पेडणेकर गोवनवार्ता लाईव्हवर | पुनव स्पेशल

राज्यात निवडणुकांचं रणशिंग वाजलं! मुख्यमंत्री एक्शन मोडमध्ये

एकच नंबर | पीएसीही म्हणतंय सुशेगाद गोवा नव्हे सुशासित गोवा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!