#Cyclone #Tauktae #TropicalCyclone | वादळांना नावं कशी दिली जातात?

काय असते नाव देण्यामागची प्रक्रिया?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : अनेकांना उत्सुकता असते की पावसाळ्यापूर्वी आपल्या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांच नामकरण कोण करत असाव? कोणते संदर्भ त्यासाठी लावले जातात, नावं विचित्र आणि न ऐकलेली का असतात? याच उत्सुकतेच्या काही खोलात गेल्यावर खालील माहिती मिळाली. ज्यांना या नावांची गंमत वाटते त्यांना ही माहिती नक्कीच आवडेल.

हेही वाचा – Cyclone | चक्रीवादळाला देण्यात आलेला तौक्ते शब्द कुठून आला? तौक्तेचा अर्थ काय?

2000 साली जागतिक हवामान संस्थेच्या परवनगीने भारत , बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश असलेल्या आशिया आणि पॅसिफिकसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने ठरवलं की आपल्या प्रदेशातल्या चक्रीवादळाची नावं आपण ठेवायची. पुढे 2018 मधे आणखी पाच देशांचा समावेश या आयोगात करण्यात आला. यामधे इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन ही राष्ट्रं होती. या वादळांना 13 राष्ट्रांनी प्रत्येकी 13 नावं दिली अशी एकूण 169 नावं तयार आहेत. भारतानेही गती, तेज, मुरासू ,आग, व्योम, झार, नीर , प्रभंजन, घुरनी, अंबड ,जलाधि, प्रोभाओ आणि वेग अशी नावे दिली आहेत.

हेही वाचा – ६ मे रोजी झालेल्या विमानाच्या इमर्जन्सी लॅन्डिंगची गोष्ट! काय घडलं? कसं घडलं? का घडलं?

प्रत्येक देशाने नावं पाठवल्यावर आयोगाच्या समितीने त्यातली काही नावं चक्रीवादळासाठी अंतिम केली. त्याप्रमाणे दरवर्षी एका राष्ट्राने सुचवलेले नाव या चक्रीवादळाला दिलं जातं. ही सगळी नावं त्या त्या देशांतील वादळाशी संबंधीत विशेषणं अथवा समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे दुसऱ्या देशांची ही नावं आपल्याला वाचण्यास वा उच्चारण्यास अवघड वाटतात.

गुलाब, साहब, गिगुम, निन्नादा, पिंकू, क्यीकान, तहाम्तन अशी वेगवगळी इतर देशांनी सुचवलेली नावं यात आहेत. म्हणजे येणाऱ्या काही वर्षांत “पश्चिम किनारपट्टावर पिंकूचा तडाखा…. साहबचं थैमान” अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील.

बरं ही नावं ठरवताना काही नियमही लावले जातात.

1) प्रस्तावित नाव राजकारण आणि राजकीय व्यक्ती ,धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि लिंग यांसंदर्भात तटस्थ असावे.

2) नावाची निवड अशा प्रकारे केली पाहिजे की यामुळे जगातील कोणत्याही लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत.

3) नाव फारच उद्धट आणि निष्ठूर अर्थाचं असू नये.

4) नाव लहान, उच्चारण्यास सोपे आणि कोणत्याही सदस्यास आक्षेपार्ह असू नये. पण अनेकदा नावांचे उच्चार आणि अर्थ कळण्यास कठीणच जातात.

5) नावातील अक्षरांची जास्तीत जास्त संख्या आठ असेल.

6) प्रस्तावित नाव त्याच्या उच्चारण आणि व्हॉईस ओव्हरसह प्रदान केले जावे.

7) उत्तर हिंदी महासागरावरील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेतली जावी. प्रत्येक नाव नवीन असले पाहिजे.

अंतिम नावांची यादी खाली फोटोत दिली आहे.

हेही वाचा – Video | Light गेली असेल तर Mobile चार्ज करण्यासाठी ‘हा’ जुगाड कामाला येईल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!