मुलांनी दिव्यांग विनिताचा आदर्श घ्यावा

IAS  होण्याचे लक्ष्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे विनिता बिचोलकर या युवतीने सिद्ध करून दाखविले. अपंगात्वामुळे सर्व व्यवहार व्हिलचेअर्सच्या मदतीने करणारी विनिता बिचोलकर या युवतीने परिस्थितीवर मात करत बीए परीक्षेत 86.45 टक्के गुण मिळवलेत. लहानपणापासून 75% प्रमस्तिष्क अंगघात (सेरिब्रल पैल्सि) व्याधीने ग्रस्त असलेली विनिता आता मानसशास्त्र घेऊन M.A करण्यासाठी सज्ज झालीये. एवढेच नव्हे तर भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेला गवसणी घलण्यासाठी ती स्वतःला तयार करतेय.

तिला तिच्या कार्यात यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. तिच्या या वाटचालीत झुआरीनगरच्या एमईएस ( MES) कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या शिक्षकांचे मोठे योगदानये याबद्दल तिने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीये. तिच्या अपंगात्वामुळे कुटुंबाने हार पत्करली नाही. वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी सतत धावपळ केली. शिक्षण घेताना अनेक अडथळे पार केले मांगोरहिलच्या सेंट टेरेझामध्ये दहावीपर्यंत आणि सेंट अड्रयू उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंत तिनं शिक्षण घेतलंय.

त्यानंतर तिनं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर झुआरीनगरच्या एमईएस कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला अशी ती म्हणाली. त्यावेळचे प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांच्यासमोर माझ्या वडिलांनी सर्व माहिती दिल्यावर प्रा. पाटील सरांनी खूप धीर दिला. काही काळजी करू नका आम्ही तिच्यासाठी वर्ग तळमजल्यावर आणु असे आश्वासन देखील पाटील सरांनी दिले. अपंगत्वामुळे तिला वेगाने लिहिता येत नव्हते. त्यावेळी सर्व शिक्षकवर्गान माझ्यासाठी विविध पर्याय माझ्यासमोर ठेवून मला प्रोत्साहन दिले असेही विनिताने सांगितले. प्रा.डॉ. रेखा गावकर यांनी देखील मला त्यावेळी खूप सहकार्य केलंय. प्रा. डॉ. रेखा प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी विनितला मदत करायच्या. तिसऱ्या वर्षाला तिनं मानसशास्त्र हा विषय निवडला होता. त्यावेळेस संपूर्ण मानसशास्त्र विभागाने मला इतका आधार दिला की शब्द कमी पडतात. शिक्षकाना माझी कार्यक्षमता माहीत होती त्यामुळे त्यांनी मला माझ्या सर्वोकृष्ट कामगिरीसाठी प्रोसाहन केले. असही तिनं सांगितलंय. हा प्रवास बघता विनीता युवा पिढीसाठी आदर्श बनलीये.

हेही वाचा

मराठी,हिंदी,कोकणी भाषेचा वाद सोडा आणि या शिक्षकांकडून काहीतरी शिकाhttps://www.goanvartalive.com/viral/trending-news/a-goan-teachers-pratikshalande-supriyasalgaonkar

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!