वारंवार आग्रह करुनही मास्क घेण्यास नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलय, संकटही अद्याप टळलेलं नाही. आरोग्य मंत्रालय वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार आवाहन करत असतात. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसतायेत.

आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ शेअर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केलंय. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात दिसत असून यावेळी तिथे स्टॉल लावलेली व्यक्ती त्यांना मास्क घेण्याचा आग्रह करताना दिसते. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसतात.

आम आदमी पक्षाने व्हिडीओ शेअर करताना, ‘मोदींसारखं वागू नका, मास्क घाला’ अशी उपहासात्मक टीकाही केलीये.

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा उल्लेख आम आदमी पक्षाने व्हिडीओत केलेला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.