VIDEO VIRAL | स्वत:चाच मास्क चावू लागला प्रवासी

विमानातील गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

वॉशिंग्टन: कोरोना काळात मास्कचं महत्त्व काय आहे याचा तुम्हाला अंदाजही नसेल. मात्र असं असतानाही अनेक विचित्र घटना समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ अमेरिकन एअरलाइन्समधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये विमानातील प्रवासी अचानक मास्क चावू लागला. येथील दुसऱ्या एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

जेरेमी हॅरिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका वृत्तानुसार त्याच्यासमोर एक आशियन महिला बसली होती. टीम तिला टाकून बोलू लागला आणि म्हणाला की, तू येथून नाहीस त्यामुळे आपल्या देशात निघून जा. जेव्हा फ्लाइट लँड झाली त्यानंतर पोलिसांनी टिमला अटक केली. या फ्लाइटमध्ये 162 प्रवासी प्रवास करीत होते. यातील आरोपी टिम हा 61 वर्षांचा असून तो लास वेगास येथील राहणारा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!