तिरुपतीच्या पुरात फसलेल्या पुजाऱ्याला ट्रॅफिक पोलिसाने वाचवलं

शूरवीर पोलिसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक; सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सध्या दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. तिरुपतीहून समोर येत असलेल्या व्हिडीओंमध्ये शेकडो यात्रेकरू भीषण पुरात अडकल्याचे दिसत आहे. घाट रोड आणि तिरुमला हिल्सचे रस्ते बंद आहेत. या जागांशी संबंधित अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

जीवाची बाजी लावत पुजाऱ्याचे प्राण वाचवले

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुराच्या वेळी पुजारी अडकतात आणि मदतीसाठी ओरडतात आणि त्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेले सीआय श्री नायक त्यांना मदत करण्यासाठी पाण्याशी झुंज देत दोरीच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या जीवाची बाजी लावत पुजाऱ्याचे प्राण वाचवतात.

बचावकार्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर

आंध्र प्रदेश पोलिसांनी बचावकार्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 6 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्सही या तरुणाचे कौतुक करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याचे लोकांकडून कौतुक

या पोलीस अधिकाऱ्याचे लोकांकडून कौतुक होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले, ‘इन्स्पेक्टरचे धाडस वाखाणण्याजोगे आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘पोलिसांच्या या प्रतिमेला कोणीही दाखवत नाही… अशा धाडसी अधिकाऱ्याला सलाम, आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘शूर पोलीस हवालदार, त्याला पुरस्कार मिळायला हवा. या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!