VIDEO: रेल्वे ट्रॅकवर थांबला ट्रक, समोरून आली ट्रेन, पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा…

भरधाव ट्रेनची ट्रकला जोरदार धडक; थराकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: रेल्वेचा प्रवास खरंतर सगळ्यात सुंदर असतो, असं म्हटलं जातं. मात्र, काहीवेळा असे रेल्वे अपघात घडतात ज्यांच्याबद्दल ऐकूनही थरकाप उडतो. सोशल मीडियावर तुम्ही रेल्वे अपघाताचे अनेक भयानक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेच्या टेक्सासमधील शहर सँट एंटोनियो येथील आहे. यात एक ट्रेननं ट्रकला धडक दिल्याचं पाहायला मिळतं.

हेही वाचाः नवीन पदे भरण्यापूर्वी कंत्राटी अभियंत्यांना सेवेत कायम करा

रविवारी दुपारची घटना

एका रिपोर्टनुसार, ही घटना रविवारी दुपारी घडली. हायवे 183 वर बनलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही ट्रक थांबलेली होती. इतक्यात मागून एक ट्रेन आली. यानंतर ट्रेन थेट ट्रकला जाऊन धडकली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा ट्रेन अतिशय वेगात होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कशाप्रकारे ट्रेन वेगात आलेली आहे आणि ट्रकचे मागच्या बाजूला धडक मारते.

जोराची धडक; ट्रक पलटी

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रकच्या मागील भागात विंड टरबाईन ब्लेड ठेवले गेले होते. ट्रेन याच भागाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होतीस की ट्रक पलटी झाला. मात्र, सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

हेही वाचाः कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात भाजप सरकार अपयशी; राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटलं की खरंच रेल्वे अपघात अतिशय भयंकर असतात. त्यामुळे ट्रेनपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!