SHOCKING | कॉमेडीचा बादशाह गेला, राजू श्रीवास्तव यांचे निधन

वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. ज्येष्ठ कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा:वाळू भराव नष्ट करण्यासह बेकायदेशीर वृक्षतोड…

४० दिवसांपासून एम्समध्ये

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये गेल्या ४० दिवसांपासून दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि ते व्हेंटिलेटरवर होते. अखेरीस हृदय आणि मेंदूशी संबंधित गुंतागुंतांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा:सर्वसंमतीने मार्केटची जागा ठरवणार…

व्यायाम करताना आला हार्ट अटॅक

राजू श्रीवास्तव त्यांच्या नियमित दिनचर्येनुसार, ते नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज इस्पितळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा:काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा…

१०० टक्के ब्लॉकेज

राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते.
हेही वाचा:गौरव बिद्रे याच्याविरोधात ३०३ पानी आरोपपत्र दाखल…

१९८८ मध्ये अभिनयाला केली सुरुवात

राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही दिसले होते.
हेही वाचा:माेदींच्या जीवनावर पणजीत प्रदर्शन…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!