ऐकावं ते नवलंच! 119 वर्षापूर्वीच्या पुस्तकाच्या एका पानाचा एवढ्या कोटींना लिलाव

शेरलॉक होम्सच्या 'द हाऊंड ऑफ द बास्करविल्स' या कांदबरीतील एका पानाला तब्बल 3.13 कोटींची किंमत मिळाली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जगप्रसिद्ध गुप्तहेर शेरलॉक होम्सला ओळखणार नाहीत असे खूप कमी लोक असतील. जगभरातल्या सर्वच देशांमध्ये त्याचे चाहते असल्याचं दिसून येतंय. या शेरलॉक होम्सशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल तर ती खरेदी करण्यासाठी चाहत्यांची झुंबड लागते. शेरलॉक होम्सच्या ‘द हाऊंड ऑफ द बास्करविल्स’ या 119 वर्षापूर्वीच्या मूळ कादंबरीच्या एका पानाचा लिलाव तब्बल 3 कोटी 13 लाख रुपयांना करण्यात आला आहे. 

या पानाची लांबी आणि रुंदी ही अनुक्रमे 33 सेमी आणि 20 सेमी

या पानाची लांबी आणि रुंदी ही अनुक्रमे 33 सेमी आणि 20 सेमी अशी आहे. हे पान अगदी मूळ स्वरूपात असून ते अद्याप चांगल्या स्थितीत आहे. यामध्ये शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांना एका हत्येवर आणि संशयितावर चर्चा करत असल्याचा संदर्भ आहे. ‘द हाऊंड ऑफ द बास्करविल्स’  हे पुस्तक 119 वर्षांपूर्वीचं असून हे सर्वात लोकप्रिय आहे. याच सीरिजमध्ये शेरलॉक होम्सचा मृत्यू होतो आणि पुन्हा आठ वर्षानंतर तो परत दिसतो. या जगप्रसिद्ध पुस्तकाचं लेखन कॉनन डॉयल यांनी केलं आहे. या पुस्तकामध्ये मूळ 185 पानं होती, सध्या त्यामध्ये केवळ 37 पानं शिल्लक राहिली आहेत. 

1902 साली शेरलॉक होम्स परत आला

डेली मेलशी बोलताना हेरिटेजच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 1894 साली लोकप्रिय कॅरेक्टर शेरलॉक होम्स मेल्यानंतर कॉनन डॉयल यांनी ‘द हाऊंड ऑफ द बास्करविल्स’ मध्ये पुन्हा एकदा जिवंत केलं. हे पुस्तक त्यांच्या सीरिजमधील सर्वात लोकप्रिय पुस्तक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!