मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर

थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: ट्रेन, बस आणि कारच्या अपघातांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी आकाशात होणारा अपघात पाहिलाय का? अनेकदा हेलिकॉप्टर किंवा विमानं काही तांत्रिक अडणींमुळे क्रॅश होतात. सोशल मीडियावर सध्या मॅक्सिकोमधील एका हेलिकॉप्टरच्या क्रॅशचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

हेही वाचाः Atal Pension Yojna: दर महिन्याला 210 रुपये गुंतवा; म्हातारपणी महिन्याला मिळवा 5 हजारांची पेन्शन

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

सोशल मीडियावर मॅक्सिकोमध्ये झालेल्या एका दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण तर हवाई यात्रा करण्यासच घाबरू लागले आहेत. मॅक्सिकोमधील एक नौदलाचं विमान अचानक कमी उंचीवर उडत असतानाच जमिनीवर क्रॅश झालं. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वैमानिकानं हा अपघात रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला.

नौदालाचं विमान मॅक्सिकोमधील वादळात अडकल्यामुळे क्रॅश झालं

मिळालेल्या माहितीनुसार, नौदालाचं हे विमान मॅक्सिकोमधील वादळात अडकल्यामुळे क्रॅश झालं आहे. आकाशात झेप घेताच हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी अडचण आल्यानं हे हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवर आलं होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आधी हे हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवर येतं. यानंतर आधी हे एका कारला धडकतं. वैमानिक हा अपघात टाळण्याचा आणि हेलिकॉप्टर बॅलन्स करण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र, पुन्हा एकदा ते एका व्हॅनला धडकतं. दोन्ही गाड्या वाचल्या मात्र हेलिकॉप्टरचं नुकसान झालं. या घटनेत नौदलाचे चार जवान जखमी झाल्याचं समोर आलं आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!