VIRAL फोटो | कपाळावर टिळा असणाऱ्या व्यक्तीनं बुरखा घातलेल्या महिलेला मारलेली मिठी

काय आहे वायरल फोटोमागील सत्य?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एका अल्पवयीन जोडीचा फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस चर्चेत आहे. यात एका हिंदू मुलाने मुस्लिम मुलीशी विवाह केल्याचं दिसून येत आहे. तसंच फोटोमध्ये एका माणसाच्या कपाळावर टिळा आहे, तर त्याच्याबरोबर दिसलेल्या महिलेने गुरखा घातला आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. पण आता ते फोटो प्रत्यक्षात तुर्कीच्या जोडप्याचे असल्याचे आमच्या पडताळणीत समोर आलंय.

रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून आम्ही या फोटोची पडताळणी केली. आम्हाला व्हायरल ट्विटवर नेमका हाच फोटो सापडलाय. हे ट्विट 6 ऑक्टोबर 2020 रोजी केलं गेलं होतं. या जोडप्याचे अजून काही फोटोही त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर दिसून आलेत.


हा फोटो शोधताना कुब्रा बथूहान या नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या लिंकचे पुरावे सापडलेत. या अकाऊंटवर सुद्धा त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळालेत.

बायो अकाउंटमध्ये आम्हाला यूट्यूब चॅनेलचा पुरावा सापडला. हे चॅनल या जोडप्याचं असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं. या यूट्यूब चॅनेलवर त्यांनी तुर्कीमध्ये राहत असल्याचं सांगितलंय.

हा सगळा प्रकार बघून ही फक्त अफवा असल्याचं समोर आलंय. हे जोडपं मूळचे तुर्कीचे असून त्यांचा भारताशी कुठलाही संबंध नसल्याचे आमच्या फॅक्ट चेकमध्ये दिसून आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!