गोवन वार्ता लाईव्हच्या ब्रेकिंग वापरुन Viral होतंय Meme

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : टीम इंडिया जिंकली. सगळ्या भारतीयांना आनंद झाला. क्रिकेट चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. आनंद गोव्यालाही झाला. गोंयकर मीमर्सनाही झाला. नव्या जमान्याची भाषाच मीम्सची भाषा आहे. म्हणून सध्या लोकं मीम्सच्या भाषेत बोलत राहणारच. त्यांना नाकारुन चालणार नाहीच. पण वाचक म्हणून प्रत्येकानं जागरुक राहणंही गरजेचं आहे. ते ही विसरयला नको.
मीमर्सही गोवनवार्ता लाईव्हच्या प्रेमात
अवघ्या तीन महिन्यांत गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोवन वार्ता लाईव्हला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. फेसबुक, वेबसाईट, यू ट्यूब, व्हॉट्सऍप सगळीकडे गोवन वार्ता लाईव्हने अल्पावधित आपली छाप सोडली आहे. आणि आता तर लोकं गोवन वार्ता लाईव्हच्या ब्रेकींगचा फॉरमॅट वापरुन मीम्सही साकारत आहे. मीम्सकडे गंमत म्हणून पाहिलं जातं.. असंच एक गमतीशीर मीम्स सध्या गोवन वार्ता लाईव्हच्या ब्रेकींगचा एक फोटो वापरुन मॉर्फ करण्यात आलं आहे. टीम इंडियाला मिळालेल्या विजयाचा संदर्भ घेऊन गोवन वार्ता लाईव्हनं दोन दिवसांपूर्वी केलेली ब्रेकींग छेडली गेली. आणि त्याचं मीम साकारण्यात आलं.
हा पाहा मीमचा स्क्रिनशॉट –

सत्यही माहीत असावं म्हणून…
सर्व वाचकांना गोवन वार्ता लाईव्ह विनंती करते आहे, की त्यांनी अशा मीम्सकडे फक्त गंमत म्हणून पाहावं. जर आमच्या कोणत्याही ब्रेकींगचा क्रॉप केलेला, किंवा अर्धवट फोटो आपल्याला येत असेल, तर त्याची माहिती आम्हाला +91 80105 41136 या नंबरवर पाठवा. चुकीची माहिती कुणापर्यंतही पोहोचू नये, यासाठी आम्ही आपल्याला हे आवाहन करत आहोत. मीमर्सच्या क्रीएटीव्हीटीचं कौतुकच आहे. पण हे कौतुक फक्त गंमतीपुरतं. आम्ही अशा कृत्याला अजिबात प्रोत्साहन देत नाही आणि कधीच दिलंही जाणार नाही.
यानिमित्तानं आम्ही आपल्याला हे स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाच पद्धतीनं भविष्यात चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या आमच्या ब्रेकींगच्या स्वरुपात मॉर्फ केल्या जावून फॉरवर्ड होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आमच्या +91 80105 41136 या अधिकृत नंबरवर आम्हाला कनेक्ट व्हा. व्हॉट्सऍपवर असाल तर तिथे आमच्या ब्रॉडकास्टमध्ये जोडले जा. व्हॉट्सअप डिलीट करुन सिग्नलवर स्विच झालेले असाल, तर तिथेही आम्ही आहोत. आणि हो.. खाली मॉर्फ केलेल्या ब्रेकींगचा खराखुरा फोटोही आम्ही तुम्हाला देत आहोत. जेणेकरुन सत्य आणि मीम्स.. यातला फरक तुम्हाला कळेल.
Posted by Goanvartalive on Sunday, 17 January 2021
बाय द वे… टीम इंडियाला खूप साऱ्या शुभेच्छा… ऐतिहासिक विजयाची बातमी अजूनही वाचली नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव! टीम इंडियात नवे आहेत.. पण छावे आहेत