#Factcheck | सुप्रीम कोर्टानं आपले घोषवाक्य खरंच बदललं?

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी (Punyaprasoon Valpayee) यांनी दोन फोटो ट्विट करीत दावा केला आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) आपले चिन्ह बदलून ‘सत्यमेव जयते’ (सत्याचा नेहमी विजय होतो) या ऐवजी आता ‘यत धर्मस्ततो जयः’ (जेथे धर्म तेथे विजय आहे) असे केले आहे. परंतु, काही वेळानंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले. परंतु, शेकडो ट्विटर युजर्संनी याच दाव्याने हे दोन्ही फोटो शेअर केले आहेत.
पडताळणी
सुप्रीम कोर्टाचे चिन्ह बदललेले नाही. सुप्रीम कोर्टाचे घोषवाक्य नेहमीपासून ‘यतो धर्मस्ततो जयः असेच राहिले आहे. याआधीही ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य नव्हते. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर घोषवाक्य बदलल्याचे कोणतेही पत्रक नाही.
काय आहे Fact?
ज्येष्ठ वकील एम. एल. लाहोटी यांच्या मतानुसार, स्वातंत्र्यापासून सुप्रीम कोर्टाचे घोषवाक्य ‘यतो धर्मस्ततो जय:’ हेच राहिले आहे. प्रत्येक कोर्टात ज्या ठिकाणी न्यायाधीश बसतात. त्यांच्या मागे हे चिन्ह लावलेले असते. एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात घोषवाक्यसंबंधी माहिती मागितली होती. यानंतर सांगितले गेले की, घोषवाक्य महाभारतातील श्लोक ‘यतः कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जयः’ मधून घेण्यात आले आहे.