#Factcheck | अल्पवयीन, अनाथ मुलीसोबत चुलत्यानंच केलं लग्न ?

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः मेहताब रझाने नवरीच्या पेहरावात असलेली मुलगी जास्त वयाच्या व्यक्तीसोबत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कॅप्शन आहे की १० वर्षीय अल्पवयीन मुलगी अनिताचे दिवंगत वडील अशोक चतुर्वेदीचे चुलत भाऊ शिवनाथ चतुर्वेदी सोबत लग्न लावून देण्यात आले आहे. ज्या पंडितने यांचा विवाह केला आहे. त्याचा निषेध. जे बाल विवाहाला प्रोत्साहन देतात त्यांचाही निषेध
पडताळणी
वास्तविक हे प्रकरण पाकिस्तानमधील आहे. तारिक नावाच्या वयस्कर व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले होते. पाकिस्तानच्या Baaghi TV वर २० ऑगस्ट २०२० रोजी ही बातमी आली आहे.
काय आहे फॅक्ट?
हे प्रकरण पाकिस्तानच्या मुलतान शहरातील मूजा राम कली परिसरातील आहे. याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १० वर्षांच्या अनाथ मुलीचे एका ४० वर्षीय व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आले. GNN टीव्हीवर हा व्हिडिओ दिसतो. तो १७ ऑगस्ट २०२० रोजी अपलोड केला आहे. तारिक नावाच्या त्या व्यक्तीला नंतर पोलिसांनी अटक केली.