#Factcheck | लव्ह जिहाद आणि हत्येची अफवा की सत्य ?

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः दोन प्रेमी जोड्यांचे फोटो एकाच जोडप्याचे असे सांगून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यात दावा करण्यात आला आहे की एका हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केले. नंतर तिची हत्या करण्यात आली. जिहादी मुस्लिम अशा कॅप्शनसह “BJP Balochistan” नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून ही कहाणी शेअर झाली आहे. चार हजारांहून अधिक रिट्विटस झाले आहेत.
पडताळणी
सत्य काय आहे, आंतरधर्मीय लग्न केलेली यातील एक जोडी जिवंत आहे. तर (लग्नानंतर असा दावा केलेल्या) दुसऱ्या एका जोडीचा त्या हत्या झालेल्या मुलीशी काहीही संबंध नाही.
काय आहे फॅक्ट?
डेहराडूनच्या या जोडीचे नाव लवी जोशी (फेसबूक पोस्टवरील नाव) व मुहंमद आदिल पाशा असून ती दोघेही जिवंत आहेत, असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. आमचे लग्न झाल्यावर माझा नवऱ्याने खून केला अशी अफवा सोशल मीडियावरून पसरवली होती, असे सुरभी चौहान (लवी जोशी) हिने सांगितले. प्रेत मिळाले आहे ती महिला गाजियाबादची आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. ती कोण ते अजून कळलेले नाही.