Factcheck | 27 डिसेंबरपासून गोव्याच्या सीमा सील होऊन पुन्हा लॉकडाऊन?

सोशल मीडियात पुन्हा लॉकडाऊनची अफवा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेले काही दिवस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सगळ्यांनीच धास्ती घेतली आहे. अनेक भागात पुन्हा एकदा जमावबंदीचा निर्णय घेतला जातो आहे. तर काही भागात निर्बंध घातले जात आहेत. अशातच गोव्यातही पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, याबाबतचा एक मेसेज वायरल केला जात आहे. मात्र हे खरं आहे का?

यूकेमधून जवळपास एक हजार नागरीक राज्यात दाखल झालेत. त्यातही काहींना कोरोनाची लागण झाली असल्याचं एकच खळबळ उडाली आहे. अशातच गोवा राज्याच्या सीमा सील केल्या जाणार असल्याचा मेसेज वायरल झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडालाय. मात्र हा मेसेज खरा आहे की खोटा याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी या वृत्तामध्ये कोणतंही तत्थ नसल्याचं समोर आलं आहे. मंत्री मायकल लोबो यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नसल्याचं म्हटलंय.

काय म्हणाले मंत्री लोबो?

नाताळ आणि वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा पर्यटकांचा ओढा राज्यात वाढला आहे. अशावेळी राज्यातील पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. मात्र या वातावरणात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा कुणीतरी पसरवली आहे. मात्र यात कोणतंही तत्थ नाही. राज्यात संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेतला जाणार नसून पर्यटन व्यवसायाशी संबंधित असल्यांनी निश्चिंत राहावं.

पाहा व्हिडीओ – लॉकडाऊनसोबतच टॅक्सी वाल्यांबद्दल मायकल लोबोंचं महत्त्वाचं विधान

महाराष्ट्रात निर्बंध, आणि गोव्यात?

महाराष्ट्रात नव्या कोरोना स्ट्रेनमुळे रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच जगभरातही पुन्हा एकदा वेगवेगळे निर्बंध लागू केले जात आहेत. कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना घेतला जात आहेत. मात्र राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार नसल्याचं मंत्री लोबो यांनी स्पष्ट केलं.

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे बेजबाबदारपणे वागून चालणार नसल्याचंही मंत्री लोबो यांनी स्पष्ट केलंय. मास्कचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं, नितांत गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पत्रकारांनी लॉकडाऊन बाबात प्रश्न केल्यानंतर मायकल लोबो यांनी सविस्तर आपलं म्हणणं मांडलंय.

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!