#Factcheck | विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून केरळमधील तरुणीची छेडछाड ?

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः दीप्ती साहूने फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात एका मुलीसोबत दिवसाढवळ्या छेडछाड केली जात आहे. मुलगी ओरडत आहे. तिचे कपडे फाडले आहे. युजरने दावा केला आहे की, हा व्हिडिओ केरळमधील आहे. छेडछाड करणाऱ्या व्यक्ती विशिष्ट समाजाच्या आहेत, असे उघड म्हटलेले नाही, परंतु कॅप्शन वाचल्यानंतर हेच संकेत जातात. या पोस्टला १० हजारांहून अधिक वेळा शेअर करण्यात आले आहे.
पडताळणी
व्हिडिओ तीन वर्षे जुना आहे. तसेच तो आंध्र प्रदेशातील प्रकाशममधील आहे. आता या व्हिडिओला धार्मिक रूप देऊन सोशल मीडियावर केरळचा सांगून शेअर केले जात आहे. ट्विटर यूज़र ‘भैयाजी_कहिन (BJP)’ च्या ट्विटखाली एका युजरने रिप्लाय करताना हा व्हिडिओ केरळचा नाही तर हैदराबादचा आहे. तसेच जुना आहे, असे सांगितले आहे. त्याने टाइम्स ऑफ इंडियाच्या व्हिडिओचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.
काय आहे फॅक्ट?
गुगल सर्च केल्यानंतर २६ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेला व्हिडिओ मिळतो. दुसऱ्या दिवशी तो टाइम्स नाउवरही आला आहे. त्यानुसार, हैदराबादच्या कनिगिरी पोलिसांनी कॉलेज विद्यार्थिनीसोबत छेडछाड करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक केली होती. मुख्य आरोपींना अटक झाली होती. तसेच, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.