#Factcheck | कंगनासोबत बारमध्ये उभी ती व्यक्ती अबू सालेम ?
अनेक गोष्टी वायुवेगाने viral होत असतात, पण त्यातलं काय खरं काय खोटं हे तपासण्याची वेळ आलेली आहे. कशावर विश्वास ठेवायचा?, काय Share करायचं? आणि काय नाही Share करायचं याचा Special Report

महेश दिवेकर | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः बारमध्ये एका व्यक्तीसोबत बसलेल्या अभिनेत्री कंगना राणावतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ही व्यक्ती १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अबू सालेम आहे, असा दावा केला जात आहे. फेसबुकवर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
पडताळणी
खरं पाहता, या फोटोत कंगनासोबत पत्रकार मार्क मान्यूअल आहे. अबू सालेम नव्हे. गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर २४ सप्टेंबर २०१८ रोजी आलेली हफिंग्टन पोस्टची बातमी मिळते. यात हा फोटो आहे.
काय आहे फॅक्ट?
या बातमीचे शीर्षक ‘Kangana Ranaut Should Realise She’s Too Talented To Milk Her Personal Life For Attention’ होते. ही बातमी मार्कने लिहिली होती. जो स्वतः या फोटोत कंगनासोबत आहे. हा जुना फोटो आता अबू सालेमसोबत कंगना, या दाव्याने शेअर केला जात आहे
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.