FACT CHECK : सरकार सर्व मोबाईल वापरकर्त्यांना देत आहे 28 दिवस मोफत रिचार्ज? जाणून घ्या व्हायरल मेसेजचे सत्य

व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

दूरसंचार कंपन्या सतत त्यांच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. खास प्रसंगी किंवा सणांच्या वेळी तर अशा अनेक ऑफर्स पहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार एका खास योजनेअंतर्गत सर्व यूजर्सना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार ‘मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम’ अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. मेसेजमध्ये लोकांना रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अशा मोफत रिचार्जचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकाल याची माहितीही मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने त्याची चौकशी केली. ज्यामध्ये असे आढळून आले की व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. हा संदेश आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना पीआयबीने म्हटले आहे की, हा दावा खोटा आहे, केंद्र सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!