VIDEO| आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच

पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे देशात रोज शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. प्रवाशांनी वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून खास ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती केलेली असते. मात्र हेच ट्रॅफिक पोलीस अनेक वेळा लाच स्वीकारताना आपल्याला दिसतात. लाच स्वीकारतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. सध्या चेन्नईमधील तिरुमंगलम येथील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गजहब उडाला असून लोक पोलिसांवर टीका करत आहेत.

हेही वाचाः ‘संघाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचे’

ट्रॅफिक पोलिसाने ट्रक चालकांना पकडले

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हे चेन्नईमधील तिरुमंगलम येथील आहे. हा व्हिडीओ पूर्ण एका मिनिटाचा आहे. यामध्ये ट्रॅफिक पोलीस ट्रक चालकाकडून लाच स्वीकारत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ट्रॅफिक पोलिसाने ट्रक चालकांना पकडले आहे. ट्रक बाजूला उभे करायला लावून ट्रॅफिक पोलीस त्यांच्याशी वाद घालत आहे. पोलीस चालकांशी हातवारे करुन बोलत आहे. तर ट्रक चालक पोलिसाला आम्हाला जाऊ द्या असे म्हणत विनवणी करत असल्याचे दिसत आहे.

पोलीस आणि ट्रक चालक यांच्यात वाद

लाच घेत असलेल्या ट्रॅफिक पोलिसाचे नाव श्रीनिवासन असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहन चालक कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्याचा फायदा हा पोलीस घेत आहे. त्याने ट्रक चालकाला पैसे मागितले आहेत. पोलीस आणि ट्रक चालक यांच्यातील वाद संपल्यानंतर शेवटी वैतागून ट्रक चालकाने आपल्या खिशातून पैसे काढले आहेत. पोलिसाने बड्या शिताफीने हे पैसे घेतले आहेत. तसेच हे पैसे खिशात टाकून त्याने ट्रक चालकांना सोडले आहे.

हेही वाचाः कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं

लाच स्वीकारल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तो भारतभर व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच या लाचखोर पोलिसावर कारवाई केली जावी अशी मागणीदेखील करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ ट्रॅफिक पोलिसांने या प्रकाराची चौकशी केली जात असून व्हिडीओची सत्त्यता तपासून योग्य ती कारवाई करु असे सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ :

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!