VIDEO | सावर्शे-खडकी पुलावर पाणी

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्याला पावसाने झोडपून काढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालंय. धुव्वाधार पावसानं सत्तरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सत्तरीतील अनेक गावामधील जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सोनाळसह धारखण, कुडसे, सावर्शे, गांजे, धामसे, खडकी, गुळेली या ८ गावांचा संपर्क वाळपई शहरापासून तुटलाय. सावर्शे – खडकी पुलावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं पहायला मिळतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!