VIDEO | मडगावात बर्निंग कारचा थरार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः येथे गुरुवारी बर्निंग कारचा थरार पहायला मिळालाय. कोलवा सर्कल येथे गुरुवारी दुपारी एका बीएमडब्ल्यू कारला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. जीए 08 के 2266 क्रमांकाची ही कार नक्की कशामुळे आगीच्या भक्षस्थानी पडली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कार आगीत पूर्णपणे जळून खाक झालीये. सध्या हा बर्निंग कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

पहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!