VIDEO | मुख्यमंत्र्यांनी केवळ आपली काळजी बोलून दाखवली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा कुणाच्या हातात दिलेलं नाही… कुणीही, कुठेही फिरू शकतं… पोलीसही काळजी घेतायत… मुख्यमंत्र्यांनी केवळ आपली काळजी बोलून दाखवली, असं पर्यटन मंत्री बाबू आजगावकर म्हणालेत. बाणावली समुद्रकिनाऱ्यावर अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावरून वातावरण चांगलंच तापलं. जेव्हा १४ वर्षांच्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर असतात, तेव्हा पालकांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवं. या मुली रात्रभर बाहेर का होत्या? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या पालकांना केल्यामुळे विरोधी पक्षांसह सर्वसामान्यांकडून त्यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. या प्रकरणी पर्यटन मंत्र्यांना प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिलंय.. पर्यटन मंत्री अजून काय म्हणालेत, त्यासाठी पहा हा व्हिडिओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!