Video | Exclusive | आधी आंदोलक पोलिसांंमध्ये बाचाबाची, त्यानंतर दगडफेक आणि मग लाठीचार्ज

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

ब्युरो : मोपा विमानतळ आणि हायवेला तीव्र विरोध केला जातो आहे. ज्या गोष्टी शेळ-मेळावलीमध्ये घडल्या होत्या त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पेडण्यात होताना पाहायला मिळते आहे. नागझर पेडणेमध्ये आज संघर्ष पाहायला मिळालाय. आधी पोलिसांवर अंदाधुंद दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांनी प्रतिहल्ला करत केलेला लाठीचार्ज या घटनेनं वातावरण एकूणच ढवळून निघालंय.

नेमकं काय झालं?

मोपा विमानतळ लिंक रोडसाठी भूसर्वेक्षणाचं काम सध्या सुरु आहे. या कामासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिकांचा विरोध असल्यानं सर्वेक्षणाच्या कामात अडथळ येऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान, सोमवारी बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांवर आधी दगडफेक करण्यात आली. स्थानिकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगडफेकीनंतर पोलिसही सावध झाले. त्यांनी तात्काळ प्रत्युत्तराखातर लाठीचार्ज केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!