Video | ‘आजच्या आनंदाश्रूंची चव गोड होती’ अजिंक्य रहाणेचा मराठीतून संवाद
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : भारतीय क्रिकेटमध्ये आजचा दिवस इतिहासात नोंदवला गेलाय. भारतानं चौथी कसोटी जिंकत मालिका खिशात घातली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या कामगिरीत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावली ती भारतीय कॅप्टन अजिंक्य रहाणेने. अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचं फक्त नेतृत्त्वच केलं नाही, तर संघाला जिंकण्याचा विश्वासही दिला.
ऑस्ट्रेलियातून परतताना भारतीय संघ ताठ मानेने परतेल. त्यात सिंहाचा वाटा हा अजिंक्य रहाणेचा आहे, यात दुमत नाहीच. या अजिंक्य रहाणेला ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी मराठीतून प्रश्न विचारला. ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना अजिंक्य रहाणेने उत्तरही मराठीतून दिलं. कोच रवी शास्त्रीसुद्धा यावेळी मराठीतूनच बोलले. नेमकं या दोघांनी काय म्हटलं..?
पाहा व्हिडीओ –
Listen to this what Rahane's feelings were after winning 4th test and Shastri on Pujara. खास मराठीमध्ये #MarathiSpecial #IndvsAusTest @ajinkyarahane88 #RockSolid @cheteshwar1 @RaviShastriOfc pic.twitter.com/gyzwRBrVkK
— Sunandan Lele (@sunandanlele) January 19, 2021