UNCUT | अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर आत्महत्या केलेल्या अन्वय नाईकांची पत्नी काय म्हणाली, ऐकाच!

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर पत्रकार परिषद

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : अर्णब नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अर्णब यांच्या अटकेनंकर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पोलिसांचे आभार मानलेत. तसंच अर्णब यांच्यावर टीका केली आहे.

सुशांत आत्महत्याप्रकरणात सुसाईड नोट नसतानाही बराच गदारोळ झाला. मात्र अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव लिहूनही कारवाई न करण्यात आल्यानं त्यांनी सवाल उपस्थित केले. अखेर गोस्वामींना झालेल्या अटकेनंतर नाईक यांच्या पत्नीनं पोलिसांचे आभार मानलेत.

इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी 2018मध्ये आत्महत्या केली होती. सुशांत आत्महत्याप्रकरणावरुन आक्रमक झालेल्या अर्णब यांच्यावर या प्रकरणावरुन सातत्यानं सवाल उपस्थित केले जात होते. अखेर त्यांनी अटक झाल्यानंतर नाईक यांच्या कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडलीये.

त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? पाहूयात संपूर्ण पत्रकार परिषद…UNCUT

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!