VIRAL VIDEO | प्रेशर कुकरमध्ये गोलगोल चपात्या बनवण्याचा देसी जुगाड!

सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल; व्हिडिओ पाहून नेटकरीही झाले अवाक्

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आपण आपल्या आईला घरी तव्यावर चपाती भाजताना पहिलं आहे. रुमाली रोटी आणि तंदुरी रोटी बनवण्याची प्रक्रिया मात्र काहीशी वेगळी असते. परंतु, आपण रोज घरात जी चपाती खातो ती तव्यावरच शेकून बनवली जाते. मात्र, सध्या एक महिला प्रेशर कुकरमध्ये गोगोल चपात्या बनवत असल्याच्या व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या अनोखा ‘जुगाड’ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत  या व्हिडीओत महिला चक्क छोट्या आकाराच्या प्रेशर कुकरमध्ये लाटलेली चपाती टाकून ती शेकताना दिसत आहे. यानंतर अवघ्या दोनच मिनिटांत ही चपाती तयार झालेली दिसते.

पाहा व्हिडीओ

आपण या व्हिडीओत या महिलेचा भन्नाट जुगाड पाहू शकता. घरगुती चपात्या या नेहमीच तव्यावर तयार केल्या जातात. पण इथे या महिलेने चक्क कुकरचा वापर केला आहे. साधारण कुकरमध्ये डाळ, भात आणि भाज्या शिजवल्या जातात. पण चपाती-पोळी बनवण्याचा जुगाड सगळ्यांनीच पहिल्यांदाच पहिला असावा.

हा व्हिडिओ पहाः VIRAL VIDEO: काचेच्या बाटलीवर बॅलन्स, महिलेचा थरारक स्टंट

काय आहे नेमकं ‘या’ व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओत महिला 3 चपात्या छान गोलाकार आकारात लाटून घेते. मोठ्या आचेवर गॅस सुरू ठेवून त्यावर कुकर ठेवून त्यात तिन्ही चपात्या एकत्र टाकून झाकण बंद करते. त्यानंतर दोन बोटं दाखवून दोन मिनिटांचा इशारा करते. यानंतर ती प्रेशर कुकरचे झाकण उघडून त्यातून चपात्या बाहेर काढते. या चपात्या ती जेव्हा ताटात काढते तेव्हा त्या छान शेकलेल्या दिसतात. हे दृश्य खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!