SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार

१७ आणि १८ ऑगस्ट असे दोन दिवस उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी कराः नास्नोळा पंचायत

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास योग्यपद्धतीने सुरू आहे. आपण वैयक्तिकरीत्या क्राईम ब्रँचशीही याबाबत चर्चा केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं. सिद्धी नाईकच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची नास्नोळा पंचायतीची मागणी केलीये.‌

सोमवारी कोविड मृतांचा आकडा वाढला

सोमवारी कोवि़ड मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला. गेल्या २४ तासांत ५ जणांना कोविडमुळे मरण आलं. गोमेकॉत तिघांचा, तर दक्षिण जिल्हा हॉस्पिटलात दोघांचा मृत्यू झाला.

सोमवारी 62 कोरोनाबाधितांची नोंद

सोमवारी आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार 62 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीये. त्यामुळे राज्यातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्य आता 873 झालीये.

गेल्या 24 तासांत 4 रुग्णांची कोरोनावर मात

गेल्या 24 तासांत 96 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 4 रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

गेल्या 7 महिन्यात गोव्यात 17 बलात्काराची प्रकरणे

गेल्या 7 महिन्यात गोव्यात  17 बलात्कार प्रकरणांची नोंद झाली आहे. हा आकडा धक्कादायकच म्हणायला हवा. मागच्या 7 महिन्यांध्ये 14 बलात्कार, 12 विनयभंग आणि 15 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे.

सावंतवाडी-काजरकोंड येथील तरुणाची आत्महत्या

सावंतवाडी काजरकोंड येथील ४० वर्षीय विल्सन डिसोजा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आता शिवसेनाही टाकणार लेटरबॉम्ब, गडकरींना करणार सवाल

कोकणातील रस्ते आणि विमानतळाच्या मुद्द्यावरून शिवसेना थेट गडकरींनाच पत्रं लिहिणार असून केंद्र सरकारची चालढकल त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.

सिंधुदुर्गात आज 101 कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात 46 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर सक्रीय रुग्णाची संख्या 1 हजार 996 चलीय. आज आणखी 101 रिपोर्ट झिटीव्ह आले.

सिंधुदुर्गातून रविवारी 45 कोरोनामुक्त

सिंधुदुर्गातून रविवारी 45 जनांनी कोरोनावर मात केलीय

सिंधुदुर्गात सोमवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1,298 वर पोहचलीय. तर रविवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय.

कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावर दागिने चोरीला

कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या ध्यानात आले

नितीन गडकरींच्या पत्रानं शिवसेनेत वादळ, अजितदादांनीही टोचले शिवसेनेचे कान

राज्यातील महामार्गांच्या कामावरुन गडकरींचे आरोप जिव्हारी लागल्यानं शिवसेना नेत्यांनी सारवासारव सुरू केलीय. या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेचे कान टोचलेत.

सोमवारपासून राज्यात मंगलकार्यालयांना सूट

राज्यात सोमवारपासून खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉलमधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे  पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण मिळालेत. कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण मिळालेत.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकणसह काही भागात  पावसाचा वर्तवण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावर

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावर होऊन माझ्या उंचीप्रमाणे वागा, नाहीतर भेटायला येऊ नका अशा शब्दात कार्यकर्त्यांना झापलं

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही;  संभाजी ब्रिगेडची टीका

राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नसल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केलीय.

बारा सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी काँग्रेसला सुनावलं

बारा सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह धरता? अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं.

देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची धास्ती

रविवारी  दिवसभरात जगभरात इराणनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात करण्यात आली आहे. अमेरिकेत भारताहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

पेगाससद्वारे हेरगिरी प्रकरण; आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमणार

मोबाइल फोनमधून पेगासस स्पायवेअरद्वारे हेरगिरीच्या आरोपांप्रकरणी चौकशी केली जाईल. यासाठी एक समिती नेमली जाईल. केंद्र सरकारने ही माहिती दिली.

मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला

मेघालयाचे माजी विद्रोही नेते चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू यांच्या मृत्यूनंतर राज्यात हिंसाचाराच्या घटनांत वाढ झालेली दिसून येतेय.  मुख्यमंत्री संगमा यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला करण्यात आल्याची घटना आता समोर आलीय.

संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या वर्चस्वाखाली

तालिबाननं पुन्हा एकदा 25 वर्षान्नात्र अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. राष्ट्रपती अशरफ घनी  यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिलाय.  

काबुल एयरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा गोळीबार; पाच जणांचा मृत्यू

आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करायला गेलेल्या अमेरिकन सैन्याने काबुल एयरपोर्टवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात किमान पाच लोक मृत्यूमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत.

भारतासोबत हवेत चांगले संबंध; तालिबानन केली भूमिका स्पष्ट

तालिबानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे असल्याचं बोलत आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने हि प्रतिक्रिया दिलीय.

काबूलमधील परिस्थिती पाहता भारत सरकारकडून अलर्ट जारी

काबूलमध्ये परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. काबूलमध्ये तालिबानच्या प्रवेशानंतर परिस्थिती खूपच खराब झाली असल्याने विमानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

कोरोनानंतर वटवाघळांमुळे पसरतोय मारबर्ग विषाणू

Marburg Virusच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी दक्षिणी ग्वाइडो प्रांतात झाली आणि आता 150 पेक्षा जास्त लोकांना त्याच्या या विषाणूची लागण झाली आहे. नुकतंच एका व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती who ने दिलीय

भूकंपाने हादरले हैती; 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

भूकंपाने हादरले हैती; 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू या भूकंपात आतापर्यंत 724 लोकांचा मृत्यू झाला असून कमीत कमी 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत

वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताला ८ सुवर्णासह १५ पदक

भारताच्या युवा तिरंदाजांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली. भारताच्या पदकांची संख्या १५वर गेली आहे. यात ८ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!