SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

शनिवारची कोविड आकडेवारी

शनिवारी पुन्हा कोविड मृतांची पाटी कोरी, सक्रिय रुग्ण संख्या ९२५ वर, तर २४ तासांत ८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद.

महेश अडेलकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

दिल्लीत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप – एसपीजीमध्ये वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक असलेले खोलपे -साळ डिचोली येथील महेश अडेलकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.

सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवला

सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्याच्या विषयावर अखेर पडदा पडला. नौदलाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी स्थानिकांच्या उपस्थितीत बेटावर तिरंगा फडकवला आणि सर्वांनी मिळून राष्ट्रगीतही म्हटलं.

माजी‌‌ मंत्री मिकी‌ पाशेको यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

मिकी पाशेकोंनी बिनशर्त काँग्रेस प्रवेश केलाय. इतर अनेक लोकही काँग्रेसमध्ये प्रवेशास उत्सुक आहेत. सर्वांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. पी.चिदंबरम यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती झायीले. मी अजून गोव्याच्या प्रभारीपदी कायम आहे, असं काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी माहिती दिलीये.

राष्ट्रपती पदक जाहीर

आयजीपी राजेश कुमार, उपअधीक्षक किरण पोडवाल , आयबीचे गोवा विभाग प्रमुख अरविंद कुमार नायर यांना राष्ट्रपती पदक; तर उत्कृष्ट कामगिरीसाठी श्रीकृष्ण पर्रीकर यांना अग्निशामक पदक जाहीर

वैभववाडी शहरात पिण्याच्या पाण्यात सापडल्या अळ्या

वैभववाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या आहेत. शनिवारी सकाळी नळाला आलेल्या पाण्यात या अळ्या आढळून आल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुडाळात सापडलं खवले मांजर

कुडाळ पिंगुळी शेटकरवाडी येथे  रविंद्र तातू पालव यांच्या घरासमोर लोकवस्तीत खवले मांजर दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

सिंधुदुर्गात आज 79 कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात 46 हजार 586 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर सक्रीय रुग्णाची संख्या 2 हजार झालीये. आज आणखी 79 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.

सिंधुदुर्गातून शनिवारी 41 कोरोनामुक्त

सिंधुदुर्गातून शनिवारी 41 जनांनी कोरोनावर मात केलीय

सिंधुदुर्गात शनिवारी कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 292 वर पोहचलीय. तर शनिवारी कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय

जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 479 जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 91 हजार 479 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; रत्नागिरीत दोघांना अटक

नियमांचे उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्याने रत्नागिरी शहर पोलिसांनी येथील बाजारपेठेतील दोघांना अटक केली. यामध्ये मोबाईल शॉपी मालकासह पनवेल येथील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.

साडेपाच वर्षांत मलेरिया, डेंग्यूमुळे गोव्यात  केवळ दोन मृत्यू!

गेल्या साडेपाच वर्षांत गोव्यात मलेरिया आणि डेंग्यूमुळे केवळ दोघांचा मृत्यू झाला. तर २,२५० जणांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना धमकी

मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सएपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तिनं धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे.

मद्यपान करताना तरुणाचा खून; मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले

सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण होऊन दोन मित्रांनीच खून केला. दोघांनी मृत दत्तात्रय याच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेच्या पाईपमध्ये टाकल्याची कबुली दिली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी ; नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडचणी येतायत. अशाच अडचणी सुरु राहिल्यास राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

राज्यात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण; दोन्ही डोस घेतलेल्या 10 रुग्णांनाही लागण

राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यापैकी 10 जणांनी दोन्ही डोस घेतले असून 8 जणांनी एक डोस घेतल्याच म्हटलंय

मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; ‘त्या’ ई-मेलने खळबळ

मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने एकच घबराट उडाली आहे. एका ई-मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे.

कोरोना, डेंग्यूपाठोपाठ ‘स्क्रब टायफस’चा धोका

तिस-या लाटेचं वादळ घोंगावत असतानाच राज्यात स्क्रब टायफसनं डोकं वर काढलंय. विदर्भात याचे चार रूग्ण आढळून आले आहेत. यातले तीन रूग्ण नागपुरातले आहेत तर 1 रूग्ण गोंदियाचा आहे.

दहशतवादी हल्ल्याचे सावट; दिल्ली ते काश्मीरसह मुंबईपर्यंत हाय अलर्ट

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या भीतीने दिल्ली ते काश्मीरपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  याशिवाय ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.

अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती

भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणारा 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंदने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार आहे.

कोरोनाचा मेंदूवर होतोय वाईट परिणाम

कोरोनातून बरे झालेल्यांना विचार करण्यात आणि एकाग्र होण्यात अडचणी येत आहेत. तसेच  स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणंही अनेकांमध्ये दिसून आली. मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून हे समोर आलंय.

14 ऑगस्ट ‘फाळणी वेदना दिन’ म्हणून साजरा होणार

14 ऑगस्ट रोजी ‘फाळणी वेदना दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केलं आहे.

सुरक्षा दलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, 4 दहशतवादी अटकेत

स्वतंत्र्य दिनानिमित्तानं मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळला आहे जैश-ए-च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून 4 दहशतवाद्यांना अटक केली.

राहुल गांधींचे Tweeter अनलॉक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊट एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. सोबतच काँग्रेस पक्ष आणि इतर महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंटही सुरु झाले आहे.

न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन आता न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशन

NBA चे नाव बदलून NBDA झाल्याने डिजिटल बातम्या प्रसारित करणारी माध्यमं डिजिटल मीडिया न्यूज ब्रॉडकास्टर्सही NBDA च्या कार्यकक्षेत येणार आहेत.

कोरोनाची लस घेऊनही 2 लाखांहून अधिक जणांना लागण

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत कोरोनाची लस घेऊनही 2 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; तज्ज्ञांचा इशारा

करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल जाणवायला लागली असली तरी दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, असं दिल्ली स्थित एम्स रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय.

अमेरिकेत श्वेतवर्णीयांची लोकसंख्या घटली

अमेरिकेतील जनगणनेतील काही भाग प्रकाशित करण्यात आला असून श्वेतवर्णीयांच्या लोकसंख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. श्वेतवर्णीयांची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.

तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवल्यास वाईट परिणाम

तालिबानने भारताला धमकीदेखील दिली आहे. भारताने अफगाणिस्तान सरकारच्या मदतीसाठी सैन्य पाठवल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे तालिबानने म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!