SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट... एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

सलग दुसर्‍या दिवशी कोविड मृतांची पाटी कोरी

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोविडचा एकही बळी नाही, 103 नव्या रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 983

वाळपईच्या अल्पवयीन मुलीवर युवकाकडून अतिप्रसंग

अनोळखी तरुणाशी फेसबुकवर मैत्री करणं अल्पवयीन मुलीला पडलं महागात, वाळपईच्या अल्पवयीन मुलीवर युवकाकडून अतिप्रसंग, मणेरी-दोडामार्गच्या तरुणाला अटक

गव्याची हत्या

आंबेदुलय-धारबांदोडात गव्याची हत्या, पाय आणि शिंगं कापून नेल्यानं शिकार झाल्याचा कयास

म्हापशात दागिन्यांच्या दुकानात चोरी

राज्यात चोरांचा सुळसुळाट, म्हापशात दागिन्यांच्या दुकानात चोरी, भिंतीला भगदाड पाडून 5 किलो चांदी लंपास

भाजपचं 22 इन 22 मिशन

भाजपचं 22 इन 22 मिशन सुरू, मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष मैदानात, आगामी विधानसभा निवडणुकीत 22 जागा जिंकण्याची भाजपची मोहीम

गोव्याच्या काजू फेणीचा जगभर प्रचार

गोव्याच्या काजू फेणीचा जगभर होणार प्रचार, प्रसारासाठी टपाल विभाग प्रकाशित करणार ‘स्पेशल कव्हर’

राज्य विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्येच

राज्य विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्येच होणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं स्पष्टीकरण

अधिकाऱ्यांच्या बदल्या स्थगित

दोन दिवसांपूर्वी केलेल्या 23 अधिकार्‍यांच्या बदल्या पुढील आदेश येईपर्यंत स्थगित, आयपीएस शिवेंदू भूषण यांची प्रोबेशनवर गोव्यात बदली

गोवा किनारपट्टीसाठी धोक्याची घंटा

गोवा किनारपट्टीसाठी धोक्याची घंटा, शतकाअखेरीस मुरगाव पाण्याखाली, जागतिक तापमानवाढीमुळे मुरगाव बुडणार- ‘आयपीसीसी’चा अहवाल

हणजूण सुरा हल्ला, संशयिताला अटक

हणजूण येथे पूर्ववैमनस्यातून नामदेव वालावलकर यांच्यावर सुरा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी फरारी संशयित ओबेरॉय डिक्रूझ याला अटक केली आहे.

ऊसाची मळी रस्त्यावर पडून गाड्या फसल्या

तळेरे – कोल्हापूर मार्गावर कोकीसरे नारकरवाडी येथे रस्त्यावर ऊसाची मळी पडल्याने गाड्या फसल्या होत्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

तब्बल 20 लाखांहून अधिक दारू जप्त ; दोडामार्ग पोलिसांची कारवाई

एक एनपी ट्रक भरलेली सुमारे  20 लाखांहून लाखांची गोवा बनावटीची दारू दोडामार्ग पोलिसांनी जप्त केलीय, ट्रकसह तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हाती लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आयशर कंटेनरची डंपरला जोरदार धडक

झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आयशर कंटेनरनं समोरील डंपरला जोरदार धडक दिली. यात आयशर कंटेनर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली असून  कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

अवघड वळणावर अचानक ब्रेक लागल्याने एसटी स्लिप

कुडाळ – भैरववाडी ते पंचायत समिती दरम्यान असलेल्या अवघड वळणावर समोरून येणाऱ्या स्कूटर चालकांना वाचविण्यासाठी एसटी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी स्लिप होऊन अपघात झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला सावंतवाडी पोलिसांचा दणका

सातोळी बावळट येथील तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमाला सावंतवाडी पोलिसांनी दणका दिला. कोल्हापूर येथील हर्षद जाधव यांला ताब्यात घेण्यात आले असून २५ हजारांची म़ोटर सायकल, तर २१ हजारांची दारू असा ४६ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात आज  84 कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

सिंधुदुर्गात  46 हजार 301 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर सक्रीय रुग्णाची संख्या  2 हजार 10 चलीय. आज आणखी  84 रिपोर्ट झिटीव्ह आले.

सिंधुदुर्गातून 127 कोरोनामुक्त

मंगळवारी कोरोनाबधीतांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. आज सिंधुदुर्गातून 127 जणांनिकोरोनावर मात

सिंधुदुर्गात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृतांची संख्या 1 हजार 278 वर पोहचलीय. तर बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झालाय

नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षातील सचिन वाझे शोधावेत : सतीश सावंत

शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा आम. नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षातील सचिन वाझे शोधावेत, असा उपरोधिक टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला आहे.

जाहिरातींंवर 160 कोटींची उधळण ; कर्जबाजारी शेतकऱ्यांना तंबोरा

स्वतःच्या भंपक जाहिरातबाजीवर 160 कोटी रुपये उधळणाऱ्या ठाकरे सरकारने अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटांचे तडाखे सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत, अशी घणाघाती टीका  माजी खासदार निलेश राणे यांनी केलीय.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. देशमुख यांनी खाजगी बँकांकडून नियमांचं उल्लंघन करुन कर्ज घेतलं इडीने म्हटलंय.

लग्न झालेल्या स्त्रीला प्रेम पत्र फेकून मारणे हा विनयभंगच

लग्न झालेल्या महिलेला प्रेम व्यक्त करणारी चिठ्ठी फेकून मारणे ही कृतीच विनयभंग केल्याची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचन हे निरीक्षण नोंदवलंय.

सप्टेंबरमध्ये येणारी तिसरी लाट सौम्य

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून १० ते १५ ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल; मात्र ही लाट सौम्य स्वरूपाची असेल,’ अशी शक्यता ‘टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी वर्तवली आहे.

ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड

आता दहा तासांहून अधिक काळ एटीएममध्ये पैसे नसतील तर बँकाना दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. आरबीआयचा हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे.

विरोधी खासदारांचा गोंधळ ; सभापती झाले भावूक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. दरम्यान, काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. याप्रकारानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू भावूक झाले.

मंत्रालयात दारू रिचवणारे तळीराम कोण?; प्रशासनाचे चौकशीचे आदेश

सरकारने आतापर्यंत देशपातळीवर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती भारत सरकारने लोकसभेत दिली आहे.

‘नवकाश्मिरा’त केवळ दोघांचीच जमीनखरेदी

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतरही राज्याबाहेरील केवळ दोन व्यक्तींनी तेथे जमीन खरेदी केली असल्याची माहिती मंगळवारी केंद्र सरकारने लोकसभेत दिली.

हरिद्वारला निघालेल्या बसवर कोसळली दरड, 45 हून अधिकजण बेपत्ता

निगुलसेरी राष्ट्रीय महामार्ग 5 वर अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळळून हिमाचल रोडवेजची एक बस आणि अनेक वाहनं दरडीखाली दबली गेलीत. यात 45 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर येतेय.

कोवॅक्सिन – कोविशिल्ड च्या ‘मिक्स डोस’च्या अभ्यासाला DGCI ची मंजुरी

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींच्या मिक्स डोसच्या परिणामाचा अभ्यास करण्यास  DGCI न  मंजुरी दिली आहे.

आंध्र प्रदेशात करोना रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू

बुधवारी केंद्राने आंध्र प्रदेशमध्ये करोनाच्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटर सपोर्टवर असणाऱ्या काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे झाला असल्याची माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानच्या आणखी तीन शहरांवर तालिबानचा ताबा ; क्रिकेटपटूचे जगाला साकडं

तालिबानकडून अफगाणिस्तानमधील प्रांतांच्या राजधानींवर ताबा मिळवला जात आहे. तर, क्रिकेटपटू राशिद खानने जगाला मदतीचे आवाहन केले आहे.

नर्सनं तब्बल ८६०० जणांना लसीच्या ऐवजी टोचलं मिठाचं पाणी?

जर्मनीत एका नर्सनं तब्बल ८ हजार ६०० जणांना लसीच्या ऐवजी मिठाचं पाणी टोचलं आहे. ही घटना एप्रिल महिन्यातील आहे. मात्र या घटनेचा खुलासा आता झाला आहे.

कोरोना, इबोलासारखा आणखी एक घातक विषाणू : WHO

करोना, इबोला सारखा घातक असणारा मारबर्ग हा विषाणू आढळला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. पश्चिम आफ्रिकन देश गिनी मध्ये हा विषाणू आढळला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!