VIRAL VIDEO | जीवन मरणाचा खेळ; व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

आपलं सावज पकडण्यासाठी टपून बसलेले वाघाचे बछडे; तर आपला जीव वाचवण्यासाठी माकडाच्या पिल्लााचे अटोकाट प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सोशल मीडियाचं विश्व मोठं व्यापक आहे. येथे रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. रोज नव्याने अपलोड होत असलेल्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ मजेदार असतात. तर काही थरारक असतात. सध्या असाच एक जगण्यासाठी कसरत करणारा व्हिडीओ व्हायरल आहे. या व्हिडीओमध्ये आपलं सावज पकडण्यासाठी वाघाचे बछडे आणि वाघ टपून बसलेले आहेत, तर दुसरीकडे आपला जीव वाचवण्यासाठी माकडाचे पिल्लू अटोकाट प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचाः 2000 रुपयांची नोट झाली गायब; सरकारकडून छापणं बंद

व्हिडीओमध्ये काय आहे?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोणाला मजेदार वाटतोय. तर हा व्हिडीओ पाहून काहींच्या अंगावर काटा उभा राहतोय. या व्हिडीओमध्ये माकडाचं पिल्लू झाडाच्या फांदीला लटकलेलं दिसतं आहे. माकडाचं पिल्लू ज्या झाडाच्या फांदीला लटकलं आहे, त्याच्या खाली पाणी आहे. या पाण्यात वाघाचे बछडे आणि काही वाघ आहेत. माकडाचं हे पिल्लू कधी एकदाचं खाली पडतं आणि आम्ही कधी एकदाचा त्याचा फडशा पाडू याची वाट हे वाघ पाहत आहेत. त्यासाठी माकडाचं लटकलेलं पिल्लू पकडण्यासाठी व्हिडीओतील वाघ हवेत झेप घेतायत. दुसरीकडे वाघाने हवेत झेप घेताच फांदीला लटकलेलं माकडाचं पिल्लू पुन्हा फांदीवर चढण्यासाठी धडपडताना दिसतंय.

हेही वाचाः इस्रायलच्या हल्ल्यात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, जगण्या आणि मरणाचा हा खेळ काही लोकांना चांगलाच भावला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा व्हिडीओ पाहून माकडाच्या पिल्लाचा जगण्यासाठीचा संघर्ष अनेकांना आवडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!