TECHNO VARTA | नवीन गजेट्स आणि टेक अपडेट : पहा टेक्नॉलॉजीच्या स्पेस मधे या आठवड्यात नवीन काय लाँच झाले

ऋषभ | प्रतिनिधी
गुरुवारी प्रीमियम कंपनी Apple तर्फ त्यांच्या वर्षभर चालणाऱ्या लॉन्चिंग स्केड्युल प्रोग्रमची तारीख जाहीर करण्यात आली आहे ज्यात कदाचित नवीन ऍपल स्मार्टवॉच किंवा तत्सम गोष्टींचे अनावरण होईल अशी आशा आहे . यासोबतच सॅमसंगने भारतात आपल्या नवीन स्मार्टफोनची पहिली विक्री सुरू केली आहे. तसेच Redmi चे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत.

Xiaomi India ने भारतात दोन नवीन स्मार्टफोन सादर केलेत.
कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी Redmi Note 12 4G आणि Redmi 12C लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिलेली नाही. शाओमीने तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ड्युअल कलर पर्यायासह फोन लॉन्च केला आहे.
Xiaomi ने शेवटी आपले Redmi Note 12 4G आणि Redmi 12C स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे
नोट 12 मध्ये AMOLED डिस्प्ले, 33W फास्ट चार्जिंग आणि 50-मेगापिक्सेल प्राइमरी कैमरा यांसारखी वैशिष्ट्ये दिसत आहेत. Redmi Note 12 4G वेरिएंट सनराइज गोल्ड कलरमध्ये येतो, नव्याने लॉन्च झालेल्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Redmi 12C आणि Redmi Note 12 च्या किमती
भारतात Redmi 12C ची किंमत 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसाठी रु.8,999 पासून सुरू होते. 6GB आणि 128GB स्टोरेज असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. दुसरीकडे, Redmi Note 12 ची किंमत बेस व्हेरिएंट (64GB स्टोरेज) साठी 14,999 रुपये आहे. त्याचे 6GB आणि 128GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपयांना उपलब्ध असेल.
Xiaomi फॅन फेस्टिव्हल स्पेशल अंतर्गतबँक ऑफर देखील ऑफर करणार आहेफोनची विक्री ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा फोन लुनर ब्लॅक, फ्रॉस्टेड आइस ब्लू आणि सनराइज गोल्ड या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Redmi 12C चे महत्वपूर्ण तपशील
फोनमध्ये 6.7-इंचाचा IPS LCD आहे. यात 1650 x 720 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच देखील आहे. यात स्टॅंडर्ड 60Hz रिफ्रेश रेट पॅनेल आहे, जे 500 nits च्या पीक ब्राइटनेससह येते.
स्मार्टफोनमध्ये Helio G85 SoC प्रोसेसर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देखील आहे. हे 50MP मुख्य कॅमेरा आणि QVGA लेन्ससह येते. सेल्फीसाठी, 12C मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi Note 12 4G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 12 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल-HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 685 SoC प्रोसेसरसह येतो. स्मार्टफोन 6GB RAM (LPDDR4X) आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे. 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे.

सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा सेंसर आहे. Redmi Note 12 मध्ये Android 13, हेडफोन जॅक आणि IP53-रेटेड बिल्ड बॉडी आहे. Note 12 4G ची विक्री 6 एप्रिलपासून Mi.com, Mi Home Stores इत्यादींद्वारे केली जाईल. फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो.
Apple च्या वार्षिक कार्यक्रमाची तारीख समोर आली

अॅपलचा वार्षिक कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. सदर कंपनीचा या वर्षी होऊ घातलेला हा सर्वात मोठा टेक इव्हेंट आहे. टेक दिग्गज Apple ने घोषणा केली आहे की त्यांची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2023 इव्हेंट 5 जूनपासून सुरू होईल. व्हर्च्युअल इव्हेंट 5 जूनपासून सुरू होईल आणि 9 जूनपर्यंत चालेल. यात कदाचित नवीन आयफोन लाँच होऊ शकतो.
गतवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम अॅपल पार्क येथे होणार असल्याचेही बोलले जात आहे. WWDC 2023 चे वर्णन करताना, ऍपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर रिलेशन्सच्या उपाध्यक्ष सुसान प्रेस्कॉट यांनी सांगितले की, या वर्षीची परिषद टेक जगतासाठी आतापर्यंतची ‘सर्वात मोठी आणि सर्वात रोमांचक’ घटना ठरेल.
सॅमसंगच्या नवीन फोनची पहिली विक्री सुरू झाली
Samsung Galaxy ने अलीकडेच आपल्या भारतीय वापरकर्त्यांना एक नवीन 5G स्मार्टफोन भेट दिला आहे. कंपनीने भारतात Galaxy F14 5G हा बजेट फोन म्हणून सादर केला आहे. गुरुवारपासून या नवीन फोनची पहिली विक्री भारतात सुरू झाली आहे.
जर तुम्हीही कमी बजेटमध्ये नवीन 5G स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Galaxy F14 5G Rs 12,990 च्या बेस प्राईसवर ऑफर केला आहे.

कंपनीचे बेस मॉडेल 4GB + 128GB वेरिएंट आहे, तर दुसरा 6GB + 128GB व्हेरिएंट 14,490 रुपयांना ऑफर केला जात आहे. निवडक बँक कार्ड्सने या किमतीत फोन खरेदी करता येईल.
Galaxy F14 5G ची वैशिष्ट्ये
कंपनीने आपल्या नवीनतम एफ सीरीजमध्ये नवीनस फोन सादर केला आहे. हा डिवाइस Exynos 1330 चिपसेट सह आणण्यात आला आहे. कंपनीचा हा फोन नवीन तेरा 5G बँडसह येतो.

Galaxy F14 5G फोन डिस्प्ले आणि कॅमेरा
Galaxy F14 5G मध्ये, वापरकर्त्यांना 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. Galaxy F14 5G मध्ये, वापरकर्त्यांना 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा मिळतो, तर 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी घेण्यासाठी उपलब्ध आहे.

तुम्ही डिव्हाइस कुठे खरेदी करू शकता
हे नवीन सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाईस Galaxy F14 5G तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल O.M.G. ब्लॅक, G.O.A.T. ग्रीन, आणि B.A.E. पर्पल सह खरेदी करू शकता.
तुम्ही हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. याशिवाय, नवीन डिव्हाइस Galaxy F14 5G सॅमसंग गॅलेक्सीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमधून देखील खरेदी केले जाऊ शकते.